रामदास ठुसे
नागपूर विभागीय प्रतिनिधी
चिमूर उमरेड हायवे लगत भय्यूजी शाळेजवळ आज पहाटे ५ वाजेच्या सुमारास कोळशाने भरलेला एक भरधाव ट्रक उलटल्याची घटना घडली आहे.
या अपघातात ट्रक चालक जखमी झाला असून त्याला उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मिळालेल्य माहितीनुसार,आज पहाटे ५ च्या सुमारास हा ट्रक कोळसा घेऊन जात होता.यावेळी अचानक या भरधाव ट्रकचा टायर फुटल्यामुळे टायर फुटताच चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले आणि हा कोळशाने भरलेला अवजड ट्रक भय्यूजी शाळे जवळील रस्त्यावरच पलटी झाला.
ट्रक पलटी झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात कोळसा विखुरला गेला आहे.अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत बचावकार्य सुरू केले आणि जखमी चालकाला ट्रकमधून बाहेर काढले.
चालकाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे नेण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.या घटनेमुळे परिसरातील वाहतुकीवर काही काळ परिणाम झाला होता.
संबंधित चिमूर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत असून रस्त्यावरील कोळसा हटवण्याचे काम सुरू आहे.



