विनंम्रपणे..  — आदरणीय सर्व पत्रकार बंधु-भगिणी… — सविनय..

            “तुम्ही,केवळ बातम्या संकलनकर्ता आहात असे समजू नका.आपण पत्रकार आहोत व समाज प्रेरणेचे घटक आहोत असे गृहीत धरले तर बातम्यांचा माध्यमातून आपण समाजहित साधले पाहिजे व समाजमनाला योग्य दिशा देण्याचे महत्त्वपूर्ण कार्य केले पाहिजे..

        आजच्या स्थितीत विविध संस्था व विविध संघटना अंतर्गत अनेक कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजात अंधश्रद्धेला खतपाणी घातले जात आहे.समाजात वारंवार अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या संस्था व संघटनांचा उदेश असतो की,समाजातील शेवटच्या घटकांपर्यंत उत्तम व योग्य ज्ञान पोहोचू नये व शेवटच्या घटकातील व्यक्ती समजदार,सतर्क व चिकित्सक बनू नये.

        आपण पत्रकारांनी व वार्ताहरांनी अंधश्रद्धेला खतपाणी घालणाऱ्या बातम्यांचे संकलन करून त्यात सहभागी व्हावे,यात आपले उत्तम कर्तव्य व उत्तम कार्य आहे असे मी मानत नाही.

     नेते,उच्चशिक्षित,शिक्षितीत हे अंधश्रद्धेचे निर्मूलन करण्यापेक्षा अंधश्रद्धा पसरवण्याचे कार्य विविध कार्यक्रमातंर्गत करीत असतील तर ते समाजाला योग्य दिशा देत नाही व समाज घटकांच्या उन्नतीसाठी अजिबात प्रयत्न करीत नाही हे लक्षात घेतले पाहिजे.

        नेता किती मोठा आहे किती शिकला आहे,”व्यक्ती किती शिकला आहे किती मोठा आहे, यापेक्षा नेता व व्यक्ती कोणत्या प्रकारचे कार्य करतो व कोणत्या प्रकारचे कर्तव्य पार पाडतो याकडे पत्रकारांनी व वार्ताहरांनी लक्ष केंद्रित केले पाहिजे.

           अंधश्रद्धेला व इतर अयोग्य कार्यपद्धतीला अनुसरून समाजाला वारंवार वेठीस धरणारे व समाजाला जैसे थे स्थितीत ठेवणारे नेते व व्यक्ती हे कुणाचेच नसतात,”तर, ते स्वत:च्या फायद्यासाठी धडपडणारे संधीसाधू असतात हे सुद्धा लक्षात घेतले पाहिजे.‌.

        अशा व्यक्तींना प्रोत्साहन देणे व बातम्यांच्या माध्यमातून त्यांना समाजमनात मोठे करणे आणि योग्य व्यक्तीत्व म्हणून दाखविणे म्हणजे बिनडोक कार्यपद्धतीला डोक्यात घेणे होय आणि बिनडोक कार्यपद्धतीला चालना देण्यासाठी काम करणे होय हे स्पष्ट होते..(बुध्दीहिन,सत्याच्या कसोटीवर न टिकणारे,तर्कसंगत नसलेले.)

         आपण पत्रकार आहोत ते समाजाला योग्य दिशा देण्यासाठी व उन्नत समाज निर्माण करण्यास लेखणीच्या माध्यमातून हातभार लावण्यासाठी‌.तद्वतच देश व देशातील नागरिकांच्या सुरक्षेसाठी अभूतपूर्व क्षमता पणाला लावण्यासाठी!.‌.

        पत्रकारच अयोग्य कार्याला,अयोग्य कर्तव्याला,अयोग्य भुमिकांना समर्थन देऊ लागले,”तर,देशाचे व देशातील नागरिकांचे वाटोळे करण्यात आपणही सहभागी आहोत काय?याचा थोडा तरी विचार आपण करायला हवा..

             “भारत देशातील सर्वोत्तम पत्रकार तथा जगविख्यात प्रकांडपंडित,थोर समाजसुधारक तथा विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्वांगीण कार्याकडे व कर्तव्याकडे जेव्हा बघतो,”तेव्हा,शेवटच्या घटकातील नागरिकांचा सर्वांगीण विकास व त्यांची सर्वोतोपरी सुरक्षा हाच देशातील प्रगतीचा मुख्य केंद्रबिंदू दिसतो आहे..

         महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकरांची पत्रकारिता,” भेदभाव,वर्णव्यवस्था,जातीव्यवस्था,अंधश्रद्धा,अयोग्य कार्य व कर्तव्य,चापलुसगिरी,गुलाम मानसिकता,भितीयुक्त मानसिकता,असमान कार्यपद्धत,असमान उन्नती,याला अजिबात स्थान देत नाही..”तर,सर्वांचे रक्षण-संरक्षण व सर्वांची एकसमान उन्नती याला स्थान देतो आहे.‌.म्हणूनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे विश्र्वातील सर्वोत्तम पत्रकार आहेत असे मी मानतो आहे.

          आपणही पत्रकारीता करतांना,”देशहित व देशातील लोकहित,सर्वोच्च स्थानी ठेवावे,अशी आपणास विनंम्रपणे विनंती.‌‌.

***

             आपला नम्र..

                 प्रदीप रामटेके

“दखल न्युज भारत वेब पोर्टल,”प्रबंधक मुख्य संपादक…

***

दिनांक :- २१ फेब्रुवारी २०२४,रोज बुधवार..