पारशिवनी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिरात गुरुवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा……  — १७ ते २२ फेब्रुवारी पर्यंत विविध भक्तीमय कार्यक्रम.

     कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी ::- पारशिवनी येथे पेंच रोडवरील नवनिर्मित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात,नागमंदिर,शिवलिंग मंदिर,श्री.गणेश मंदिर,हनुमान मंदीर तसेच संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व संत तुकाराम महाराज यांचे मदिरचा २१फेब्रुवारीला विधिवत भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार असल्याचे स्पार्क फाऊंडेशनचे अध्यक्ष प्राचार्य गजानन पोटभरे,सचिव जानेश इजमुलवार व कोषाध्यक्ष प्राचार्या सौ.हिमांगी पोटभरे यांनी सांगितले.

        पारशिवनी येथे पेंच रोडवरील नवनिर्मित विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आज बुधवारी प्राणप्रतिष्ठा सोहळा होणार आहे.१७ फेब्रुवारी पासून ते २२ फरवरी पर्यत अखंडीत भक्तीमय वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा शुभारंभ करण्यात आला आहे.

        स्पार्क फाऊडेशन तर्फे आयोजीत प्राण प्रतिष्ठा समारोह मध्ये शनिवार दिनाक १७ फेब्रुवारीला जलयात्रा,गौरी पूजन,कलश स्थापना.आयुष्य मंत्र जपा.व वास्तुपीठ पूजन करण्यात आले.

        रविवार दिनांक १८ फेब्रुवारीला इन्द्रध्वज पूजन झाले तर सोमवार दिनांक १९ फेब्रुवारी ला हवन रथयात्रा काढुन पारशिवनी शहरात भ्रमण करून मंदिरात पोहचली.तसेच मगलवार दिनाक २० फेब्रुवारीला शिखर कलश पूजन या करण्यात आले आणी आज बुधवार दिनाक २१ फेब्रुवारीला विठ्ठल रुक्मिणी मंदिर, नागमंदिर,शिवलिंग मंदिर,श्री.गणेश मंदिर,हनुमान मंदिर तसेच संतसम्राट ज्ञानेश्वर महाराज यांचे मंदिर व संत तुकाराम महाराज यांचे मूर्ती प्राणप्रतिष्ठा व पूजन प्रतिष्ठा,होम,काकडा व हरिपाठ होणार तर गुरुवार दिनाक २२ फेब्रुवारीला दहीकाल्याचे किर्तन व महाप्रसाद होणार आहे.

        अशा प्रकारे प्राणप्रतिष्ठा सोहळा भक्ती मय वातावरणात प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचा आनंद व लाभ घेण्याचे आवाहन मंदिर स्पार्क फाऊडेशन तर्फे अध्यक्ष प्राचार्य गजानन पोटभरे, सचिव ज्ञानेश इजमुलवार आणी कोषाध्यक्ष प्राचार्या सौ.हिमांगी पोटभरे यांनी केले आहे.