सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतीदिनानिमित्त,”बौध्द धम्म परिषद व बौद्ध धम्म समारंभ चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली येथे २ व ३ फेब्रुवारीला… — जगप्रसिद्ध महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,जगप्रसिद्ध महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती यांच्यासह भिख्खू संघ राहणार उपस्थित,मैत्री तरंगातून दाहीदिशा घुमणार धम्मवानी.. — २ फेब्रुवारीला मुख्य वक्त्यांचे मार्गदर्शन व राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजराजा गोसावी यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम.. — ३ फेब्रुवारीला धम्म देशना कार्यक्रम..

प्रदीप रामटेके

  मुख्य संपादक 

        चिमूर तालुक्यातील मौजा शिवणपायली गावातील बौध्द नागरिक हे तथागत भगवान गौतम बुद्धांच्या व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आधारित कार्यरत आहेत व विविध कार्यक्रमांतर्गत त्यांच्या विचारांचा सदोदित प्रचार आणि प्रसार करणारे आहेत.

         याचाच एक भाग म्हणून मौजा शिवणपायली येथील बौद्ध समाजातील उपासक,उपासीका,युवती,युवक दरवर्षी,”मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभुमी बहुउद्देशीय स्मारक मंडळ शिवणपायली द्वारा,२ व ३ फेब्रुवारीला,”दोन दिवसीय धम्म मेळावा,”नागसेन वन धम्मभुमी येथे आयोजित करण्यात आला आहे.

         डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर यांचे वडील सुभेदार रामजी आंबेडकर बाबा यांच्या स्मृतिदिनानिमित्त २ फेब्रुवारी रोज शुक्रवारला कार्यक्रमास प्रारंभ होणार आहे.

 

 महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती

      यानुसार सकाळी साडेनऊ वाजता महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती तथा पुज्य भिख्खू संघ यांच्या उपस्थितीत बुध्द विहार शिवणपायली येथे मुख्य धम्म ध्वजारोहण होणार आहे.

       यानंतर गावातील बुद्ध विहार ते नागसेन वन धम्मभुमी अंतर्गत सकाळी १० वाजता धम्म रॅली होणार आहे.तिथेच कार्यक्रम प्रारंभान्वये पंचशील ध्वजाचे ध्वजारोहण होणार आहे आणि लागलीच बुद्धवंदना घेतली जाणार आहे.

           याचबरोबर सुभेदार रामजी आंबेडकर बाबांच्या मुख्य कार्यक्रमाला ठिक १२ वाजता सुरुवात होणार आहे.या कार्यक्रमात़ंर्गत,” धम्म क्रांतीचे पाच सुत्रे,बाबासाहेबांना अपेक्षित समाज निर्मिती,या विषयाला अनुसरून मार्गदर्शनाचा कार्यक्रम पार पडणार आहे.तद्वतच धम्म व आंबेडकर चळवळीतील मान्यवरांचा सत्कार करण्यात येणार आहे.

          पहिल्या दिवशीच्या महत्त्वपूर्ण मार्गदर्शन कार्यक्रमाचे अध्यक्ष विविध विषयांचे तत्वज्ञानी पि.एम.डांगे वरोरा हे असणार आहेत तर कार्यक्रमाचे उद्घाटक पोलिस निरीक्षक अविनाश मेश्राम असणार आहेत.

        तद्वतच मुख्य मार्गदर्शक म्हणून प्रा.अनुपकुमार नालंदा अकॅडमी वर्धा,प्रा.डाॅ.दिलीप पाटील अलिबाग मुंबई,विनोद खोब्रागडे वरोरा,प्रा.संजय बोधे वरोरा,आ.प्रज्ञाताई राजुरवाडे मॅडम समतादूत बार्टी पुणे हे उपस्थित राहणार आहेत.

        याचबरोबर प्रमुख अतिथी म्हणून चिमूरचे उपविभागीय अधिकारी व प्रभारी अप्पर जिल्हाधिकारी किशोर घाडगे,नायब तहसीलदार डि.के.निकुरे,पोलिस निरीक्षक मनोज गभणे,समाजसेवक किशोर अंबादे,केंद्र चालक व लोकमत प्रतिनिधी विकास खोब्रागडे,आ.चौधरी वरोरा,हे असणार आहेत.

            आणि कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच वैशालीताई निकोडे,पोलिस पाटील महेंद्र डेकाटे,ग्रामसेवक लोकचंद्र भसारकर,सामाजिक कार्यकर्ते एकनाथ गोंगले असणार आहेत.

**

प्रबोधन कार्यक्रम..

         तथागत भगवान गौतम बुद्ध,राष्ट्रमाता जिजाऊ,छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज,महात्मा ज्योतिबा फुले,राष्ट्रमाता जिजाऊ,क्रांतीज्योती सावित्रीमाई,छत्रपती राजश्री शाहू महाराज,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर,आई रमाई आणि इतर संतमहापुरुष यांच्या विचारांना अनुसरून प्रबोधन करणारे,”प्रशिध्द राष्ट्रीय प्रबोधनकार मनोजराजा गोसावी, यांच्या प्रबोधनाचा कार्यक्रम २ फेब्रुवारीला रात्रो ८ वाजता नागसेन वन धम्मभुमीच्या विशाल मैदानावर होणार आहे..

***

३ फेब्रुवारीला धम्म देशना आणि मंगल मैत्री…

         जगप्रसिद्ध महास्थविर पुज्य भदंत शिलानंद,जगप्रसिद्ध महास्थविर पुज्य भदंत ज्ञानज्योती व पुज्य भिख्खू संघ यांच्या प्रमुख उपस्थितीत सकाळी ७ वाजता बुद्ध विहार येथून धम्म रॅली निघणार आहे तर सकाळी ८ वाजता ध्वजारोहण होणार आहे.

       याचबरोबर जगप्रसिद्ध महास्थविर पुज्य भदंत शिलानंद हे शिलग्रहणाबाबत धम्म वाणी प्रसारीत करणार आहेत.यानंतर ११ वाजता भिख्खू संघाला भोजनदान देण्यात येणार आहे.

         यानंतर धम्मदेशनेच्या मुख्य कार्यक्रमाला प्रारंभ होणार आहे.या धम्म देशना कार्यक्रमाचे अध्यक्ष पुज्य भदंत महास्थविर शिलानंद असणार आहेत तर उद्घाटक म्हणून पुज्य भदंत महास्थविर ज्ञानज्योती असणार आहेत.

      तर प्रमुख उपस्थितीमध्ये पुज्य भदंत यश,(महामेवा महाविहार श्रीलंका), पुज्य भदंत धम्मचेत्ती संघारामगिरी,ता.वरोरा,जि.चंद्रपूर,भदंत सोण(सोणी टेकडी वडसा),भिख्खू सोनुत्तर,भिख्खू धम्मवंश(धम्मधातु विपश्यना साधना केंद्र शिवणपायली), भिख्खूनी इंदमुनी(उरवेला मेडिटेशन सेंटर बुद्धगया.)हे असणार आहेत.

           धम्म देशनेच्या महत्वपूर्ण कार्यक्रमानंतर मंगल मैत्री होणार आहे व सुभेदार रामजी बाबा आंबेडकर यांच्या स्मृतिदिनानिमित्तच्या दोन दिवसीय बौध्द धम्म परिषद व बौद्ध धम्म समारंभाची सांगता होणार आहे.

***

आयोजकांचे विनंम्रपणे आवाहन..

        मौजा शिवणपायली येथे होणाऱ्या,”दोन दिवसीय बौध्द धम्म परिषद व बौद्ध धम्म समारंभाच्या कार्यक्रमाला,देशविदेशातील उपासक-उपासीका,आंबेडकर चळवळीतील मान्यवरांनी,सर्व समाजातील बंधू-भगिनींनी, धम्म देशनेचा लाभ घेण्यासाठी मोठ्या संख्येने आवर्जून उपस्थित राहावे,या संबंधाने आयोजक असलेल्या मिलिंद बुद्ध विहार नागसेन वन धम्मभुमी बहुउद्देशीय स्मारक मंडळ शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,बौध्द पंचकमेटी शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,बौध्द महिला पंचकमेटी शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,भीमसैनिक युवासेना शाखा शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,नवयुवक बहुद्देशीय जनकल्याण संस्था शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,समता सैनिक दल शाखा शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,सावित्रीबाई फुले महिला मंडळ शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,भिमशौर्य कन्या गृप शिवणपायली पदाधिकारी व सदस्यगण,गावातील कार्यरत महिला बचतगट भगिनीं व परिसरातील उपासक उपासीका यांनी केले आहे.