Home शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावणारी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था :- शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर…

गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावणारी श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्था :- शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : गेल्या काही वर्षांत श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेने शैक्षणिक गुणवत्तेचा आलेख सातत्याने उंचावला असून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणारे उपक्रम उल्लेखनीय आहेत, असे प्रतिपादन शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांनी केले.

          श्री ज्ञानेश्वर शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी संस्थेचे अध्यक्ष सुरेश वडगावकर, सचिव अजित वडगावकर, विश्वस्त प्रकाश काळे, बाबुलाल घुंडरे, श्रीधर कुऱ्हाडे यांच्यासह मुख्याध्यापक, शिक्षकवृंद, पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          डॉ.कारेकर म्हणाले की, शैक्षणिक गुणवत्ता जोपासतानाच स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, क्रीडा, कला व सांस्कृतिक उपक्रमांचा समतोल साधत संस्था विद्यार्थ्यांना भविष्यासाठी सक्षम घडवत आहे. राबविण्यात येणाऱ्या नाविन्यपूर्ण उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढत असून शैक्षणिक निकालांमध्येही सातत्याने सुधारणा होत आहे.

           शिक्षकांचे सातत्यपूर्ण परिश्रम, संस्थेच्या व्यवस्थापनाची दूरदृष्टी आणि पालकांचा सक्रिय सहभाग यामुळेच ही यशस्वी वाटचाल शक्य झाल्याचेही त्यांनी अधोरेखित केले. कार्यक्रमाच्या शेवटी संस्थेच्या वतीने शिक्षणाधिकारी डॉ.भाऊसाहेब कारेकर यांचा सत्कार करण्यात आला.