मविआचा जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा…

दिनेश कुऱ्हाडे

   उपसंपादक

पुणे : कांदा निर्यात बंदी, दुधाला अनुदान, दिवसा वीज आणि एकूणच शेतीमालाचे पडलेले भाव यामुळे शेतकरी प्रचंड अडचणीत आला आहे. म्हणून केंद्र आणि राज्य सरकारच्या विरोधात महाविकास आघाडीच्या वतीने 

          दिनांक 27 डिसेंबर 2023 ते 30 डिसेंबर या दरम्यान भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याचे खासदार डॉ.अमोल कोल्हे यांनी सांगितले आहे.

            दिनांक 27 डिसेंबर 2023 रोजी छत्रपती शिवरायांचे जन्मस्थान असलेल्या किल्ले शिवनेरी पासून छत्रपती शिवरायांचे आशीर्वाद घेऊन महाविकास आघाडीच्या वतीने भव्य शेतकरी आक्रोश मोर्चाला सुरुवात होणार आहे. आणि दिनांक 30 डिसेंबर 2023 रोजी हा भव्य शेतकरी आक्रोश मोर्चा आपल्या मागण्या व आक्रोश घेऊन जिल्हाधिकारी कार्यालय पुणे येथे धडकणार आहे.

              महाविकास आघाडीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या भव्य शेतकरी आक्रोश मोर्चामध्ये प्रचंड मोठ्या संख्येने शेतकऱ्यांनी सहभागी व्हावे, यासाठी खासदार डॉ.अमोल कोल्हे साहेब यांच्यासह महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांच्या प्रमूख उपस्थितीत पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते.

           तसेच कांदा निर्यात बंदी या प्रश्नावर संसदेत चर्चेची मागणी केल्यानंतर खासदार डॉ.अमोल कोल्हे आणि संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांचे संसदेच्या उर्वरित कामातून निलंबन करण्यात आले. सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांचा देखील यावेळी निषेध करण्यात आला.

             यावेळी जिल्हाध्यक्ष बापूसाहेब शेवाळे, देवदत्तजी निकम, अंकुशजी काकडे, हिरामनजी सातकर, आ.संजयकाका जगताप, सुरेशजी भोर, सुधीर मुंगसे, माऊली खंडागळे, स्वप्निल गायकवाड, विशाल झरेकर, भारतीताई शेवाळे, पुष्पाताई सांडभोर, प्रशांत गोरे, देविदास शिंदे, तेजस विरकर, गणेश गावडे यांच्यासह महाविकास आघाडीतील पदाधिकाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.