तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शनीत श्रेयांशा आणि गायत्रीच्या प्रतिकृती ठरल्या तालुक्यात अव्वल..

   कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी :- शिक्षण विभाग पंचायत समिती पारशिवनी द्वारा समाजासाठी विज्ञान आणि तंत्रज्ञान या मुख्य विषयावर आयोजित दोन दिवसीय तालुकास्तरीय विज्ञान प्रदर्शन राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी ( पारशिवनी) येथे संपन्न झाली.

            या प्रदर्शनीत उच्च प्राथमिक आणि माध्यमिक व उच्च माध्यमिक या तिन गटात एकूण ५८ मॉडेल्स विद्यार्थ्यांनी सादर केले होते.

           पुरस्कार वितरण पंचायत समिती पारशिवनीचे माजी उपसभापती तथा विद्यमान सदस्य चेतन देशमुख यांचे हस्ते वितरित करण्यात आले. 

        याप्रसंगी पंचायत समिती पारशिवनीचे गट शिक्षणाधिकारी कैलास लोखंडे,राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरी येथील प्राचार्य सोनिराम धोटे, ग्राम पंचायत भागीमहारी येथील सदस्य सचिन सोमकुवर, प्रभारी शिक्षण विस्तार अधिकारी लता माळोदे, केंद्रप्रमुख दिगांबर धवराळ, उर्मिला गायकवाड प्रामुख्याने उपस्थित होते .

        वर्ग ६ ते ८ उच्च प्राथमिक स्तर या गटात प्रथम पुरस्कार श्रेयांशा प्रशांत गजभिये (हरिहर विद्यालय पारशिवनी), द्वितीय पुरस्कार अथर्व संजय दिवटे (लालबहादूर शास्त्री विद्यालय बाबुळवाडा), तृतीय पुरस्कार झारा जमीर शेख ( नारायणा हिंदी उच्च प्राथमिक शाळा कन्हान) यांनी प्राप्त केला असून वर्ग ९ ते १२ माध्यमिक – उच्च माध्यमिक स्तर या गटात प्रथम पुरस्कार गायत्री केंसू शाह (नारायणा इंग्लिश हायस्कूल कन्हान), द्वितीय पुरस्कार तनू प्रकाश बोरसरे (राणी लक्ष्मीबाई विद्यालय पारशिवनी), तर तृतीय पुरस्कार उर्वशी उमाकांत बांगगडकर (लाल बहादूर शास्त्री विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय बाबुळवाडा) ह्या विद्यार्थ्यांनी प्राप्त केला.

        अध्यापक निर्मित शैक्षणिक साहित्य प्राथमिक गटात प्रभाकर पिंगे (जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा पारडी), माध्यमिक गटात शशिकांत वाटकर), प्रयोगशाळा सहाय्यक / परिचर गटात अशोक राठोड ( धर्मराज विद्यालय कन्हान) पुरस्काराचे मानकरी ठरले.

       कार्यक्रमाचे प्रास्ताविक गटशिक्षणाधिकारी कैलास लोखंडे यांनी, सूत्रसंचालन नीलकंठ पचारे, खुशाल कापसे यांनी तर आभार प्रदर्शन साक्षोधन कडबे यांनी केले. 

          प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी विषय तज्ज्ञ गौरीशंकर ढबाले, राष्ट्रीय आदर्श विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय नवेगाव खैरीचे शिक्षक वर्ग, विद्यार्थी यांनी परिश्रम घेतलेत.