Home Maharashtra विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचा IFSC कोड व खाते क्रमांक बदलला… — ३...

विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेचा IFSC कोड व खाते क्रमांक बदलला… — ३ महिन्यांचे कमिशन थकल्याने राशन दुकानदारांवर आत्महत्या करण्याची वेळ!… — भंडारा पुरवठा विभागाकडे तात्काळ मंत्रालयीन कारवाईची मागणी…

ऋग्वेद येवले 

  उपसंपादक 

भंडारा : सरकारी रास्त भाव दुकानदारांना मागील ५ महिन्यांपैकी जून, जुलै, ऑगस्ट या तीन महिन्यांचे कमिशन अजूनही मिळालेले नाही. ज्या रास्त भाव दुकानदारांची खाती पूर्वीच्या विदर्भ-कोकण ग्रामीण बँकेत (सध्याची महाराष्ट्र ग्रामीण बँक) आहेत, त्यांची कमिशनची रक्कम बँकेच्या IFSC कोड आणि खाते क्रमांकात झालेल्या बदलामुळे त्यांच्या खात्यात जमा झालेली नाही.

          या तांत्रिक बदलामुळे दुकानदारांचे कमिशन अडकून पडले असून, त्यांच्यासमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. या अत्यंत गंभीर परिस्थितीमुळे अनेक दुकानदारांवर आत्महत्या करण्याची पाळी आल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत जर एखाद्या दुकानदाराने टोकाचे पाऊल उचलले, तर त्याची संपूर्ण जबाबदारी अन्नपुरवठा विभागाची असेल, असा गंभीर इशारा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटना राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी दिनांक 19 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता दरम्यान दिला आहे.

         भंडारा जिल्ह्यातील सर्व बाधित दुकानदारांची जिल्हा पुरवठा विभागाकडे मागणी आहे की, विभागाकडून मंत्रालय स्तरावर तात्काळ कारवाई करून थकीत तीन महिन्यांचे कमिशन त्वरित त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावे, जेणेकरून दुकानदारांना लवकरात लवकर दिलासा मिळेल.