मारदा तोहगांव रोडलगत वनवा… — बिट गार्ड चे दुर्लक्ष…

ऋषी सहारे

संपादक

 गडचिरोली- तालुक्यातील पोटेगाव वनविभाग अंतर्गत येत असलेल्या व अवघ्या तिन कि . मी .अंतरावरील मारदा .ते तोहगाव रोडलगत आज दि. 20 मे २० 23 सकाळ पासुनच जंगलात वणवा पेटत असुन वणव्याने एवढे रुद्र रूप धारण केले आहे की जंगलात पाच कि.मी चे अंतरावर वणवा सुरू आहे. अनेक झाडे आगीत खाक झाले आहेत. एखादया कास्तकारांनी एखादी काठी , सरपण नेले तर त्याना वनविभागाच्या वनपाल व बिट गार्ड पकडतात व त्यांनां फाईन करतात.

        आता लाखो रुपयाचे झाले आगीत खाक होवूनही हाकेच्या अंतरावर लागलेली जगला तील आग विझवायला कुणी गेले नाहीत. सदर वनविभागाचे गार्ड दातार असल्याचे कळते. R Fo तामरे याचेसी फोन वरून संपर्क साधला असता नॉट रिचेबल दाखव त होता तर आफीसमधे कोनतेही कर्मचारी हजर नव्हते. सदर परिसरातील आग गेल्या दोन दिवसापासून सुरु असावी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. आग विझविणारे पण अदुश्य झाले की काय? आगीत प्रचंड प्रमाणात महत्वाची झाडे आगीत खाक झालेत त्याच काय ? आता तरी सबंधित अधिकार्‍यानी जंगलात जाऊन आग आटोक्यात आणावी व जंगलातील लाखो रुपयाचे झाडे वाचवावे.