पारशिवनी तालुका खरेदी विक्री संघाच्या निवडणूकीत भाजपा समर्थित भारतीय शेतकरी विकास आघाडीचा दणदणीत विजय… — भाजप समर्पित भारतीय शेतकरी विकास आघाडीचे सर्व ९ ही उमेदवार बहुमताने विजयी…  — खरेदी विक्री सहकारी संस्था काबीज करण्याचे काँग्रेसचे स्वप्न ठरले क्षणभंगूर…

कमलसिंह यादव 

  प्रतिनिधी

पारशिवनी :- दिंनाक २०/५/२०२३

पारशिवनी येथील भारतीय जनता पक्ष व काँगेस करिता प्रतिस्ठेची समजल्या जाणाऱ्या पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्थांच्या आज दिनांक २० मे २०२३ ला झालेल्या अतिटटीच्या निवडणूकीत सकाळी ८ ते ४ वाजेपर्यंत एकुण. ५६१ मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

खरेदी विक्री सहकारी संस्थांचे एकुण मतदार संख्या ८०० पैकी पुरुष ६६८ महिला १३२ व संलग्न प्रतिनिधी संख्या ४६ असे एकूण मतदार ८४६ होती. पैकी १६० मतदार हे मय्यत आहे.

 पारशिवनी येथील हरिहर विद्यालय व कनिष्ठ कला महाविद्यालय पारशिवनी येथे दोन मतदान केन्दात संपन्न झालेल्या निवडणुक प्रकीयेंत सकाळी ८ ते ४ या वेळेत मतदान. ५६१मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला.

 मतमोजणी आज सायंकाळी ५ वाजता. व निकाल जाहीर 

पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था ची आज शनिवार दिनांक २० मे २०२३ ला झालेल्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचा

भारतीय शेतकरी विकास आघाडी. 

व काँग्रेस व महाविकास आघाडीने शेतकरी सहकार पॅनल. या वेळी निवडणूक रिंगणात उतरवले आहेत. या निवडणुकीत काँग्रेसने आपली सत्ता कायम ठेवण्यासाठी माजी मंत्री सुनील बाबू केदार व राजेंद्र मुलकजी व चंद्रपालजी चौकसे यांच्या यांच्या चाणक्य नीतीच्या मार्गदर्शनात निवडणूक पुर्वीच आपले ५ उमेदवार अविरोध निवडून आनले आहे. त्यामुळे पारशिवनी खरेदी विक्री संघाच्या आज झालेल्या निवडणुकीत फक्त ३ उमेदवार निवडून आणण्यासाठी काँग्रेसने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती.

१५ संचालक असलेल्या खरेदी विक्री सहकारी संस्थेंत सत्ता स्थापन करण्यासाठी बहुमत ८ च हवे. या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे फक्त १ उमेदवार अविरोध निवडून आला आहे. भारतीय जनता पक्षाचे दिवंगत ज्येष्ठ नेते कमलाकर मेघर यांच्या अथक परिश्रमाने पारशिवनी तालुक्यात वैभव प्राप्त करून नाव लौकीक केलेली पारशिवनी तालुका शेतकी सहकारी खरेदी विक्री संस्था ही भारतीय जनता पक्षाची अस्तीमा आहे. त्यामुळे या निवडणुकीत काँग्रेसला मात देण्यासाठी सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती. प्रकाशभाऊ वांढे. व आजी. माजी आमदार यांनी काँग्रेस ला मात देण्यासाठी विशेष परिश्रम घेतले.

 निवडून आलेले उमेदवार भारतीय शेतकरी विकास आघाडीचे उमेदवार…. 

राजेश मधुकर कडू. नेताजी देवरावजी खडतकर. सुरेश राघोजी भगत. दिलीप किसनजी वाळके. उत्तम चिंतामणराव सायरे. हे सर्व साधारण मतदार संघातून विजयी झाले. तर महिला राखीव गटातुन सौ. विमल विनायक जगनाडे व सौ. छाया लक्ष्मण येरखेडे. विजयी झाल्या. इतर मागासवर्गीय गटात चंद्रभान नामदेवराव इंगोले व भटक्या जाती /विमुक्त जमाती गटातुन कंचनराव खेमगिरजी गिरी विजयी झाले. तर अरुण भानुदास लांजेवार हे अविरोध निवडून आले आहेत. 

आता भारतीय जनता पक्ष समर्थीत. भारतीय शेतकरी विकास आघाडीचे १० संचालक निवडून आले आहेत. 

 भारतीय जनता पक्षाने आपली अस्मिता कायम ठेवली 

पारशिवनी खरेदी-विक्री संघाच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने आपली प्रतिष्ठा व अस्तिमा कायम ठेवण्यासाठी माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी. आमदार आशिष जयस्वाल व सुधाकर मेंघर सदस्य जिल्हा नियोजन समिती. प्रकाशभाऊ वांढे. यांच्या कुशल मार्गदर्शनात निवडणूकीची रणनीती आखली व परसराम राऊत. पवन बोंदरे सरपंच दहेगाव जोशी. शंकरराव चहांदे. रामभाऊ दिवटे. राजेश ठाकरे. डॉ. प्रमोद भड. राहुल नाखले नगरसेवक. विजय उपासे. आदी कार्यकर्तेनी परिश्रम घेतले व अखेर आपली परंपरा कायम ठेवली. 

विजयी उमेदवारांचे माजी आमदार डी मल्लिकार्जुन रेड्डी. आमदार आशिष जैस्वाल. सुधाकर मेंघर. प्रकाशभाऊ वांढे. डॉ प्रमोद भड अध्यक्ष वैद्यकीय आघाडी भारतीय जनता पक्ष महाराष्ट्र. राजेश ठाकरे. व्यंकटराव कारामोरे जिल्हा परिषद सदस्य. आदींनी अभिनंदन केले.