भिमज्योत कॉलनी साईनगर येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी. 

युवराज डोंगरे/खल्लार 

        उपसंपादक

         भिमज्योत कॉलनी साईनगर,अमरावती येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

       सकाळी सर्वप्रथम पंचशील ध्वजारोहण करण्यात आल्यानंतर सामूहिक वंदना घेण्यात आली. या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संध्या चंद्रमणी गणवीर ह्या होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून सौ संगीता सुरज मंडे, प्रा . नरांजे, प्रा.धर्मेंद्र दुपारे आणि हिम्मतराव वरघट हे धम्मपिठावर विराजमान होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आयु. नलिनी सोनोने यांनी पार पाडले तर प्रास्ताविक आणि आभारप्रदर्शन माधुरी गौतमराव गजभिये यांनी पार पाडले.

         या कार्यक्रमांमध्ये संगीता सुरज मंडे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे महिलांना उद्बोधन या विषयावर आपले मनोगत व्यक्त केले. यथोचित धर्मेंद्र दुपारे आणि इतर वक्त्यांनी आपले प्रासंगिक विचार ठेवले. त्यानंतर स्नेह भोजनाने सकाळी सत्रातील कार्यक्रमाची सांगता झाली. 

         सायंकाळी आकोली परिसरातून येणाऱ्या ऱ्यालीचे स्वागत करून त्यांचे करिता थंड पाण्याची व्यवस्था करण्यात आली. आणि सर्व उपासक उपसिका यांनी ऱ्यालिमध्ये सहभाग नोंदविला.

          या कार्यक्रमाचे यशस्वीेते करिता भिमज्योत सहकारी गृहनिर्माण संस्था पदाधिकारी आणि सदस्य, महिला मंडळ पदाधिकारी आणि सदस्य, परिसरातील बहुसंख्य उपासक उपासिका आणि परिसरातील नागरीक, महिला आणि विद्यार्थी उपस्थित होते.