संपूर्ण व्यवस्थेचा EVM वरच सर्व निवडणूका घेण्याचा अट्टाहास का?  — महत्त्वपूर्ण सवाल…

     “देशात आणि विश्वात दोन शक्ती प्रबळ आहेत.एक साम,दाम,दंड आणि भेदाची कूटनीती जिला कुठलेही नैतिक बंधने नसतात,जिचे ध्येय संपूर्ण सजीवसृष्टीला निसर्ग नियमांच्या विरोधात जाऊन माणसासहीत सर्वांनाच लाचार,हतबल करून आपले गुलाम बनविणे.!

         दुसरी शक्ती म्हणजे,माणसाला सदविचारी बनविण्यासाठी विवेक आणि विज्ञानवादाच्या मदतीने….

             माणूस बनविण्यासाठी सर्वतोपारी प्रयत्न करणारी शक्ती म्हणजे विवेकावादाची शक्ती होय.

           या दोन शक्तिमध्ये देशाच्या आणि जगाच्या प्राचीन इतिहासात क्रांती आणि प्रतीक्रांतीच्या रूपाने रक्तरंजीत क्रांत्या पोळीत पुरण भरल्याप्रमाणे आहेत…..!

            याचे उदाहरणंच द्यायचे झाले तर जगाच्या इतिहासात ग्रीकमधील इ.स.पूर्व 2350 ची एरूकागीनाची मानवी हक्कासाठीची पहिली चळवळ,आणि त्यानंतर,घडत गेलेल्या…..

      भगवान बुद्धानी केलेली धम्मक्रांती ( जी रक्तहीन होती ),

         मोहमद पैगंबरानी केलेल्या क्रांतीतून अधोरेखित झालेली ” मदिनेची सनद “

         येशू ख्रिस्ताच्या क्रांतीतून निर्माण झालेला उद्रेक ज्यातून येशूला अंगावर खिळे ठोकून शिक्षा दिल्या गेली.

        अमेरिकन राज्यक्रांती,त्यानंतर अवघ्या 75 वर्षात काळ्या आणि गोऱ्यांच्या भेदातून निर्माण झालेल्या संघर्षाचा इतिहास म्हणजे अमेरिकन यादवी युद्ध ज्यामध्ये स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांचाच विजय अब्राहम लिंकन यांनी केला.

         त्यानंतर फ्रेंच राज्यक्रांती जिची मूळे आर्थिक विषमतेत दडलेली होती. 95 % लोकांकडे 5 % शेती होती, तर 5% लोकांकडे 95 % शेती होती. अशा आर्थिक विषमतेच्या टोकावर गेल्यामुळेच फ्रेंच राज्यक्रांती मॉन्टेसक्यू,रुसो,व्हालटेयर,दिदेरो सारख्या लोकशाहीवादी विचारवंतांच्या वैचारिक नेतृत्वामुळे यशस्वी होऊ शकली.

             त्यानंतर 1917 मध्ये झालेली रशियन राज्यक्रांती सुद्धा आर्थिक विषमतेमुळेच झाली,आणि तिथे लेनीनने 

 मार्क्सवादाच्या तत्वज्ञानावर आधारित रक्तरंजित क्रांति घडवून आणली. 

            परंतू बंदूकीच्या आणि तलवारीच्या बळावर थोडक्यात रक्तरंजित क्रांती ही कायम टिकू शकत नाही हे रशियाच्या झालेल्या विघटनातून सिद्ध होते.

त्याचप्रमाणे वैज्ञानिक क्रांतीच्या गर्भातून बाहेर आलेल्या सम्राज्यवादाचे रूपांतर पहिल्या आणि दुसऱ्या जागतिक महायुद्धात झाले……

        या सर्व मानवी हक्काच्या रक्तरंजित क्रांतीचे मूळ हे या कुटनीतीत दडलेले आहे,जी प्रतीक्रांतीची लाट आणण्याचा प्रयत्न करते.जी जगाला आपल्या गुलामीत ठेवण्याचा प्रयत्न गेल्या हजारो वर्षांपासून करत आहे.

    याचे उदाहरणंच घ्यायचे असेल तर………

           जेंव्हा पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी या देशात ( भारतात ) अज,यक्षु,शिग्रू ,पणी,नाग आणि द्रविड ही सहा प्रकारच्या वंशाची जनता 100% लोकशाहीची मुलतत्वे स्वातंत्र्य,समता,न्याय आणि बंधुता ( निसर्ग नियमावर आधारित असलेली ) अविष्कारीत करून जगत होती.

        त्याच समकालीन ग्रीकमध्ये सुद्धा तेथील जनता याचप्रकारच्या लोकशाही मूल्यांना अविष्कारीत करून जगत आलेली होती.या पृथ्वीतलावर या दोनच देशात लोकशाही 100% विकसित झालेली होती. अशा काळात ही कुटनीतीवर आधारलेली आर्यकुसंस्कृतीची टोळी संपूर्ण जगावर आपल्या कुटनीतीचा प्रभाव कुठे बसतो का हे शोधत शोधत संपूर्ण जग पालथा घालत होती.

          तेंव्हा त्यांच्या असं लक्षात आलं की ग्रीक आणि भारत देशातील लोकशाहीवादी जनता आपल्याला ( कुटनीतीला ) बळी पडू शकते, तेंव्हा त्यांनी हा प्रयोग करण्यास सुरुवात केली. त्यांनी एकाच वेळी परंतु वर्षानुवर्षे या दोन्ही देशात टोळ्यांच्या रूपाने त्यांनी कुसांस्कृतिक आक्रमणे करण्यास सुरुवात केली. 

          या आक्रमणाला बळी पडलेले काही वंशज संपले,जे उरले ते त्यांच्या अंधश्रद्धेला,थोतांडाला,काल्पनिक कथाना, शरण गेले तो म्हणजे येथील बहुजन समाज……!

         परंतू ,या शरण आलेल्या समाजावर कुसांस्कृतिक राज्य कुणी करायचे यावरून त्यांच्या टोळ्यामध्ये संघर्ष झाले, ज्याला इतिहासात दाशराज युद्ध म्हणून ओळखल्या जाते. या युद्धात त्या आर्याच्या टोळ्यामध्ये भरत नावाची टोळी बलदंड ठरली ( विशेष म्हणजे आर्यलोकात सुद्धा अहंकार असतो त्यांच्या त्यांच्यात सुद्धा एकी नसते…..

जेंव्हा वाटून खाण्याची वेळ जेंव्हा येते तेंव्हा यांच्यातील स्वार्थ जागा होतो. ) म्हणून या देशाला भारत नाव पडले.

          आणि तेंव्हापासून निसर्गाने प्रदान केलेल्या नैसर्गिक क्रांतीला शहा देण्याचा पहिला प्रयत्न या आर्याच्या प्रतीक्रांतीच्या रूपाने ग्रीक आणि भारतात पाऊणेचार हजार वर्षांपूर्वी झाला आणि ते त्यात यशस्वी झाले………!

       त्यानंतर त्यांनी हजारो वर्षे आपल्या कुटनीतीच्या माध्यमातून अनेक निसर्गनियमाविरोधी, विज्ञानवादाविरोधी, विवेकवादाविरोधी, जी माणसाला सदविचारी बनन्यापासून कायमची रोखणारी आहे , कुटनीतीला पोषक अशी नियमावली बनविली जिला…… ” मनुस्मृती ” म्हणतात.

        त्या मनुस्मृतीच्या आधारे स्त्रियांना कायमचे अतिशूद्र म्हणून हिनविले ( प्रत्येक मनुष्य तर मातेच्या उदारातूनच जन्मलेला असतांना एवढेच काय ज्यांनी ही मनुस्मृती लिहिली तो मनु सुद्धा मातेच्याच उदरातून आला होता ना.. जर ती माता अतिशूद्र असेल तर तो शुद्ध कसा….?) माणसामाणसात भेद केले.आणि या कुटनीतीचे अतिउच्चं टोक म्हणजे येथील सर्वसामान्य जनता दिशाहीन आणि दशाग्रस्त दयनीय अवस्थेत जगता जगता मरत होती आणि मरता मरता जगत होती. शूद्रांना तर ओल्या अन्नाच्या भिक्षेसाठी सर्वकाही करावे लागे. थोडक्यात सर्वसामान्य जनता गुलामीचे जीवन जगत होती………!!!!!!

           अशा बिकट काळात सिद्धार्थाचा जन्म झाला.त्याने येथील देशातीलच नव्हे तर एकंदर मानव जातींचे दुःख समजून घेऊन ते कायमचे हटविण्यासाठी राजत्याग करून दुखमुक्तीसाठी, जगाच्या कल्याणासाठी आणवानी वनात भटकंती करून अंतता जगाला दुःखमुक्त करणारा….

धम्म संशोधित करून आम्हाला प्रदान केला..

        जो धम्म विज्ञानवादी + विवेकवादी = मानवतावादी आहे. ही पहिली धम्मक्रांती ही त्या प्रतीक्रांतीला ( आर्याच्या ) शह देणारी ठरली जी धम्मक्रांती स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या लोकशाही मूल्यांवर आधारित होती, निसर्गनियमानुसार होती…… 

    या क्रांतिमुळेच येथील कुटीनीतीचे हणन होऊन सर्वसामान्य जनता या नवीन विचाराला स्वीकारू लागली,त्यानंतर सम्राट अशोक, सम्राट कनिष्क आणि सम्राट हर्षवर्धनाने या सिद्धांताला म्हणजेच धम्माला राजाश्रय दिल्यामुळे कुटनीतीचे आणखी हणन होऊन प्रतीक्रांतीचा नायनाट झाला……..!

            परंतू , पुन्हा एकदा पुष्यमित्र शून्गाने ब्रहद्रताची हत्या घडवून आणून कुटनीती पुन्हा यशस्वी झाली……!

         तिथून पुढे जवळपास साढेतेराशे वर्षे देश कुटनीतीला बळी पडला. याही काळात अनेक बाहेरून राजकीय आक्रमणे झाली परंतू ही कुटनीती नष्ट करण्याची हिम्मत कुणीही दाखवू शकले नाही…..!

          या साढेतेराशे वर्षात महात्मा फुले आणि सावीत्रीबाई फुले यांनी शिक्षणाचा प्रसार करून या कुटनीतीला शह देण्याचा मोठा प्रयत्न केला…

         राजर्षी शाहू महाराजांनी सुद्धा या कुटनीतीला शह देण्याचा प्रयत्न केला,परंतू मुळासहित उखडल्या गेली नाही. मात्र तिला मुळासहित उखडून टाकण्याचे काम……..

डॉ. बाबासाहेब आंबेडकर या महामानवाने भारताचे संविधान लिहून केले…… 

      देशाच्या इतिहासात साढेतेराशे वर्षानंतर केलेली संविधानक्रांती म्हणजे ……..

 निसर्गनियमांच्या विरोधात केलेल्या कुटनीतीच्या प्रतीक्रांतिवीरोधात केलेल्या पहिल्या धम्मक्रांतीचा राग कुटनीतीला जेवढा सहन होऊ शकला नाही……..

        किंबहुना त्यापेक्षाही जास्त राग या संविधानक्रांतीमूळे सहन होऊ शकत नव्हता…….

म्हणूनच या संविधानाला संपविण्याचा कट या कुटनीतीने गेल्या 75 रचला आणि 2025 ला शताब्दी वर्षानिमित्त तिला नेस्तनाबूत करण्याचा घाट या कुटनीतीने म्हणजेच RSS ने व भाजपने घातलेला आहे.

         त्यासाठी त्यांनी सुरुवातीपासून गोगलगायची गती घेतली आणि आता 2014 पासून कोरोनाची गती घेतलेली आहे………!

                   परंतू……

तुम्ही कितीही करारे हल्ला, लयी मजबूत भीमाचा किल्ला हे आम्ही दाखवून दिल्याशिवाय राहणार नाही….

       कारण ,असतील जरी आमुचे मतभेद आपसाचे…..

जयभिमच्या नावावर करू बलिदान जीवाचे,बलिदान जीवाचे…

      म्हणून संपूर्ण व्यवस्थेचा अट्टाहास आहे की काहीही झाले तरी EVM हटवायची नाही आणि बॅलेट पेपरची 100% मोजणी करायची नाही. जेणेकरून अब की बार 400 पार झाले म्हणजे संविधान बदलण्यासाठी सोपे होईल…

      गेल्या अनेक वर्षातील काही महत्वाच्या जाणूनबुजून घडवून आणलेल्या घटनाचा मागोवा घेतला असता हे ठळकपणे जाणवेल…………..

(1) वारंवार खोटे बोलणारा प्रधानमंत्री या देशाला लाभला.

(2) 15 लाख रुपये प्रत्येक भारतीयांच्या खात्यावर टाकतो म्हणणारा प्रधानमंत्री 15000/- सुद्धा टाकू शकला नाही.

(3) विनाकारण नोटबंदी लागू केली.

(4) 15 ऑगस्ट 2022 पर्यंत स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी दिनापर्यंत प्रत्येक भारतीयाला स्लॅबची पक्की घरे देण्याचे आश्वासन.

(5) देशाचे संरक्षण करणाऱ्या सैनिकांचे पुलवामा प्रकरण घडवून आणणे ( सत्यपाल मलिक यांचाच हवाला देऊन ).

(6) 6 महिने मणिपूर जळत असतांना तिथे भेटही प्रधानमंत्र्याने न देणे.

(7) अमेरिकेतील व्हाईट हाऊसमधील 75% खासदारांनी यांच्या भाषणावर बहिष्कार टाकणे.

(8) EVM बनविणाऱ्या कंपन्यामध्ये स्वतःच्या पक्षाचे संचालक बहुमतात नेमणे.

(9) अग्निविरांची निर्मिती करून देशप्रेमाला प्रायव्हेट लिमिटेड करणे.

(10) विरोधी पक्षांचे खच्चीकरण करण्यासाठी इ.डी., सि. बी. आय. चा वापर आपल्या सोईनुसार करणे.

(11) RBI कडून जबरदस्तीने पाऊणेदोन लाख कोटी रुपये घेऊन त्याचा हिशोबही कॅगला न देणे.

(12 ) 10 वर्षात एकही पत्रकार परिषद न घेणे.

(13 ) दरवर्षी 2 कोटी नोकऱ्या देण्याचे काय झाले…?

(14 ) न्यायालयीन प्रक्रियेत अप्रत्यक्ष हस्तक्षेप करून आपल्यासारखे निकाल लावून घेणे.

(15) एकेकाळी तर प्रधानमंत्री नसताना अमेरिकेने 10 वर्षाची अमेरिकेत येऊ न देण्याची बंदी असलेला ( केवळ गोध्रा कांडामुळे).

(16) काहीही करून EVM वरच निवडणुका घेण्यासाठी व्यवस्थेला ( कायदेमंडळ, कार्यकारीमंडळ, न्यायमंडळ आणि पत्रकारिता ) भाग पाडण्यासाठी सर्वकाही करणे.

(17 ) EVM च्या विरोधात कुणी कितीही जागृती केली, रस्त्यावर कुणीही उतरले तरी त्याला प्रसिद्धी देऊ न देणे.

(18) शेतकरी आंदोलनात 750 शेतकरी शहिद झाले , त्याकडे दुर्लक्ष करणे.

(19) सर्व इलेक्ट्रॉनिक व प्रिंट मिडिया पॆसे देऊन ताब्यात घेणे.

( 20 ) पुन्हा झोला लेकर आया हू, खाली हात जायेगा म्हणणारा….

(21) अदानी, अंबानीच्या ताब्यात संपूर्ण देश देऊन जनतेला भिकेला लावणारा.

(22 ) 16 लाख कोटी कर्ज भांडवलदाराचे माफ करणारा, परंतू , शेतकऱ्यांच्या कर्जमाफीवर मौन बाळगून केवळ हिंदू राष्ट्राची भाषा करणारा मुजोर प्रधानमंत्री.

(22) एकाही सहकारी मंत्र्याला पत्रकारामोर बोलू न देणारा.

(23 ) नवीन संसदेच्या उदघाटनाला राष्ट्रपतीला येऊ न देणारा.

(24 ) संपूर्ण व्यवस्थेला हायजॅक करणारा, त्यांचे संविधानिक अधिकार काढून घेणारा.

(25 ) एका खुन्याला देशाचे गृहमंत्री बनविणारा प्रधानमंत्री.

(26 ) देशातील गरिबावर उपकार म्हणून 85 कोटी जनतेला 5 किलो धान्य देणारा प्रधानमंत्री.

( 27 ) कुणी याला हिटलरची उपमा देतात. अरे हिटलर स्वतःच्या खर्चासाठी एक रुपया सुद्धा जर्मनीच्या तिजोरीतून घेत नव्हता. त्याचा वयक्तिक खर्च त्याने तुरुंगातून लिहिलेल्या Mine Kanf ग्रंथाच्या रॉयल्टीतून भागवत असे.

  हा तर दररोज लाखोचे जॅकेट कोणत्या पैश्यातून बदलतो…..?

      असे कितीतरी पुरावे देता येतील अशा संविधानविरोधी, लोकशाहीविरोधी,शक्तीचे नेतृत्व करणाऱ्या शक्तीला पुन्हा सत्तेवर बसवणार का…..?

   जरी आम्ही मत नाही दिले तरी EVM त्यांना सत्तेवर बसवणार आहे…..

 मग काय करावे लागेल….?

      त्यासाठी,आता काय व्हायचे ते होऊ देत…..

 परंतू ,निवडणुका झाल्यानंतर…… ज्याप्रमाणे यांनी संविधानाला संपविण्यासाठी गेल्या 75 वर्षात तयारी केली……!

 तशी संविधानविरोधी शक्तीला कायमचे नष्ट करण्यासाठी मी पुढील पाच वर्षाचे नियोजन करणार आहे…….. 

      त्या सर्व संविधानवादी, विवेकवादी,विज्ञानवादी, मानवतावादी भारतीय नागरिकांने निःस्वार्थपणे तन, मन आणि धनाने समर्पित होऊन या राष्ट्रउभारणीसाठी योगदान द्यावे…

            आवाहनकर्ता 

            अनंत केरबाजी भवरे 

( संविधान विश्लेषक,औरंगाबाद, रेणापूरकर, 7875452689 )