तप्त उन्हात आपल्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणाऱ्या आदिवासींना न्याय द्या:- राजु झोडे

प्रेम गावंडे

उपसंपादक 

दखल न्युज भारत

         पोभुंर्णा:आदिवासींच्या विविध मागण्यांना घेऊन पोभुंर्णा येथे तालुक्यातील आदिवासीं समाज विशाल जन आंदोलन मागील दोन दिवसापासून करत आहेत. सदर आंदोलनाला उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी भेट देऊन त्यांच्या मागण्या समजून घेतल्या व सदर आंदोलनाला पाठिंबा दिला तसेच सरकारने आदिवासी बांधवांच्या तात्काळ मागण्या मान्य कराव्या अशी मागणी केली.

    संपूर्ण तालुक्यात अनेक गावे ही 50% च्या वर आदिवासींचे आहेत. नियमानुसार 50% च्या वर असलेल्या गावांना पेसा कायद्याअंतर्गत मान्यता द्यावी लागते. आदिवासींना वनहक्क कायद्यानुसार शेतीचे पट्टे अजूनही देण्यात आले नाही ते पट्टे देण्यात यावे. या जिल्ह्याचे पालकमंत्री बफर झोन कोअर झोन यासाठी आदिवासींची जमीन वन विभागाद्वारे अतिक्रमण करीत आहेत. आदिवासींचा जगण्याचा अधिकार हिसकावून त्यांच्या मूलभूत मागण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. तालुक्यात आदिवासींना कोणताही रोजगार उपलब्ध नसून आदिवासींची शासनाकडून थट्टा केली जात आहे. पोभुंर्णा तालुक्यातील आदिवासींनी आदिवासींच्या विविध मागण्यांना घेऊन मागील दोन ते तीन दिवसापासून भर उन्हात आंदोलन करत असून शासन व प्रशासन याकडे मोठ्या प्रमाणात दुर्लक्ष करीत आहे. शासनाने तात्काळ आदिवासी आंदोलनाची दखल घेऊन त्यांच्या मागण्या त्वरित मान्य कराव्या व पेसा कायद्याअंतर्गत त्यांना त्यांचे हक्क अधिकार द्यावेत याकरिता उलगुलान संघटनेचे अध्यक्ष राजू झोडे यांनी आंदोलनाच्या ठिकाणी जाऊन मागणी केली. भर तप्त उन्हात आंदोलन करणाऱ्या आदिवासींना जिल्ह्याचे जिल्हाधिकारी व पालकमंत्री यांनी न्याय द्यावा जर आंदोलनादरम्यान अनुचित घटना घडली तर याला सर्वस्वी जबाबदार या जिल्ह्याचे पालकमंत्री व जिल्हाधिकारी राहतील तरी शासनाने तात्काळ आंदोलनाची दखल घ्यावी व आदिवासी बांधवांच्या त्वरित मागण्या मान्य कराव्या अशी मागणी राजू झोडे यांनी केली.