ऍड देवानंद पर्वतकर यांची नोटरी पदी नियुक्ती…

युवराज डोंगरे

   उपसंपादक

       खल्लार

केंद्र सरकारतर्फे नुकत्याच जाहीर झालेल्या सूचीनुसार खल्लार नजिकच्या मोचर्डा येथिल व दर्यापूर न्यायालयात गेली अनेक वर्षांपासून वकीली करणारे व सामाजिक कार्यात अग्रेसर असलेले ऍड देवानंद निळकंठ पर्वतकर यांची भारत सरकार द्वारा महाराष्ट्र राज्यासाठी नोटरी पदी नियुक्ती झाली आहे.

          ऍड देवानंद पर्वतकर हे दर्यापूर न्यायालयात कायदेशीर व्यावसायिक आहेत दर्यापूर वकील संघाचे  माजी उपाध्यक्ष म्हणून त्यांनी यशस्वीपणे काम केले आहे. दर्यापूर न्यायालयात त्यांची संयमी व शांत व मनमिळावू वकील म्हणून परिचित आहेत. त्यांची नोटरी पदी नियुक्ती झाल्याबद्दल दर्यापूर न्यायालयातील वकील संघाने त्यांचे स्वागत केले आहे.