अश्विन बोदेले
जिल्हा प्रतिनिधी गडचिरोली
दखल न्यूज भारत
कुरखेडा. : दिनांक १९/०२/२०२६ ला जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा सावलखेडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करण्यात आली.
या कार्यक्रमाप्रसंगी सर्वप्रथम रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमांना पुष्पमाला अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.
या कार्यकमाचे उद्घाटक श्री.प्रेमनाथ रामटेके प्रतिष्ठीत नागरिक यांच्या उपस्थितीत तसेच श्री.दशरथजी राऊत गुरुदेव सेवा मंडळ अध्यक्ष, तसेच प्रमुख पाहुणे सतिशजी राऊत, काशिनाथ दोणाडकर, लालाजी बारस्कर, दाणेजी, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष चंद्रकांतजी ढोक , अशोक कुमरे साहेब, तसेच गावातील प्रतिष्ठित नागरिक यांच्या उपस्थितीत हे कार्यक्रम पार पडले.
कार्यक्रमा प्रसंगी विद्यार्थ्यांचे उत्स्फूर्त सहभाग मिळाले तसेच या कार्यक्रमासाठी विद्यार्थ्यांचे शिवाजी महाराज तसेच त्यांच्या मावळ्यांचे वेशभूषा करून उपस्थितांचे मनी जिंकली. आणि गावांमध्ये गावातून रॅली काढून गावातील नागरिकांनी उस्फूर्त सहभाग नोंदविला.
या कार्यक्रमाप्रसंगी गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष श्री. दशरथजी राऊत यांनी आपल्या मार्गदर्शनात सांगितले की. महाराजांनी शून्यातून विश्व निर्माण केले. अफझलखानाचा वध, शाहिस्तेखानाची फजिती आणि आग्र्याहून केलेली सुटका हे त्यांचे पराक्रम आजही आपल्या अंगावर शहारे आणतात. त्यांनी केवळ किल्ले जिंकले नाहीत, तर रयतेची मने जिंकली. ‘गनिमी कावा’ हे युद्धतंत्र वापरून त्यांनी बलाढ्य शत्रूंना धूळ चारली.
तर सतीश जी राऊत यांनी शिवरायांचे विचार आजही तितकेच कालसुसंगत आहेत. आजच्या तरुणांनी त्यांचा इतिहास केवळ वाचू नये, तर तो आपल्या आचरणात आणावा. असे आपल्या मार्गदर्शनात सांगितले.
शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष चंद्रकांत जी ढोक तसेच कार्यक्रमाचे उद्घाटक श्री. प्रेमनाथ जी रामटेके यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी सखोल असे मार्गदर्शन करून विद्यार्थ्यांनी त्या पद्धतीने आपल्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून उत्तरोत्तर प्रगती करत राहावी. अशा प्रकारचे मोलाचे मार्गदर्शन केले.
उपस्थित मान्यवरांनी रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी सखोल असे मार्गदर्शन केले.
तसेच कार्यक्रमाप्रसंगी शाळेतील विद्यार्थी कु. सानिया बुराडे, मोहिनी जनबंधू , भार्गवी घोडमारे , तृप्ती जनबंधू , तनवी रामटेके तसेच अन्य विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवन कार्याविषयी माहिती जाणून घेतली.
या कार्यक्रमाप्रसंगी गावातील बहुसंख्य नागरिकांची उपस्थिती प्रेक्षणीय होती.
कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी उपस्थित सर्वांनी सहकार्य केले. व कार्यक्रम यशस्वीरित्या पार पडले.
या कार्यक्रमाचे संचालन तथा प्रास्ताविक लोमेश मडावी सर यांनी केले. तर आभार रामचंद्र टेकाम सर यांनी मानले.



