शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी…
चिमूर तालुक्यातील मौजा मालेवाडा येथील स्मशानभुमी अतिक्रमणाच्या विळख्यात सापडली असून, स्मशानभूमीच्या जागेवर सभोवताल अतिक्रमण केले असल्याचे स्पष्ट झाले आहे.
सातबारा व नमुना आठ नुसार मौजा मालेवाडा स्मशानभुमीची जागा ३ हेक्टर १६ ढिसमिल आहे.सदर जागेचा भुमापण क्रमांक २६३ आहे.
मौजा मालेवाडा येथील स्मशानभुमीची राखीव जागा हे ३ हेक्टर १६ ढिसमिल असतांना तेथील तलाठी व ग्रामपंचायत पदाधिकारी,ग्रामसेवक त्या जागेकडे दुर्लक्ष करतात हे वास्तव आहे.
मात्र,स्मशानभूमीच्या जागेवर नियमानुसार कुणालाही अतिक्रमण करता येत नाही.आणि कुणी अतिक्रमण केले तर जिल्हाधिकारी,उपविभागीय अधिकारी,तहसीलदार, ग्रामपंचायत पदाधिकारी,यांना अधिकार आहेत.
स्मशानभूमीची जागा जैसे थे ठेवण्यासाठी आपल्या अधिकाराचा उपयोग मौजा मालेवाडा येथील ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी केले नसल्याचे दिसून आले आहे.
मौजा मालेवाडा येथील काही नागरिकांनी तहसीलदार श्रिधर राजमाने व उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना स्मशानभूमीच्या जागेवर झालेल्या अतिक्रमणाच्या बाबतीत लेखी माहिती दिली असून स्मशानभूमीची जागा मोजण्यासाठी त्यांना साखळे घातले आहे.
स्मशानभूमीच्या जागेचे मोजमाप करुन सदर जागा कुठून कोठपर्यंत आहे याबाबत सिमा कायम करावे आणि नंतरच स्मशानभूमीर मंजूर झालेले बांधकाम करावे अशी विनंती सुध्दा,तहसीलदार श्रिधर राजमाने व उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे यांना केली आहे.





