मिलिंद विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

    उपसंपादक

   येथुन जवळच असलेल्या व राहुल व्यायाम प्रसारक, मंडळ,अमरावती द्वारा संचालित गौरखेडा (चांदई ) येथे मिलिंद विद्यालयात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे ज्येष्ठ शिक्षक दिपक कावरे, वासुदेव भांडे, प्रशांत वानखडे, अमोल बोबडे, उपस्थित होते.

          कार्यक्रमाचे प्रास्ताविक अमोल बोबडे यांनी केले. 18 पगड जातींना एकत्र करून स्वराज्याची स्थापना करणारे सर्वधर्मसमभाव या नात्याने आपल्या वागविणारे रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असल्याचे प्रतिपादन विद्यालयाचे मुख्याध्यापक अमितकुमार वानखडे यांनी केले.

           कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या फोटोचे पूजन आणि दिप प्रज्वलाने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन प्रशांत वानखडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता विद्यालयाचे शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी पूरणप्रकाश लव्हाळे, दिपक राहाटे,संजय आठवले ,आनंद खंडारे ,गणेश अंभोरे, मुमताज पठाण व विद्यार्थी यांनी प्रयत्न केले.