जि.प.पूर्व माध्यमिक शाळा, साखरी येथे शिवजयंती साजरी…

युवराज डोंगरे/खल्लार 

         उपसंपादक

         खल्लार नजिकच्या साखरी येथिल जिल्हा परिषद पूर्व माध्यमिक शाळेत छत्रपती शिवाजी महाराज जयंती साजरी करण्यात आली.

         याप्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप शिरसाट हे अध्यक्ष म्हणून तर माजी अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती सौ.मायाताई सिरसाट या उपस्थित होत्या सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पमाला अर्पण करून दिप प्रज्वलित करण्यात आली.

          त्यानंतर विद्यार्थ्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे विषय आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व तसेच प्रमुख पाहुणे यांनी उपस्थित विद्यार्थ्यांना शिवाजी महाराजांच्या कार्याविषयी माहीती सांगितली कार्यक्रमाचे संचालन शाळेचे शिक्षक विजय मकेश्वर यांनी केले तर आभार प्रदर्शन शाळेच्या शिक्षिका रेखाताई अभ्यंकर यांनी केले कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करण्यात आले.