तालुक्यातील धनेश पर्यटन संकुल सुरेवानी येथे आदिवासी युवकासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रा तर्फे चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण प्रारंभ…

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी

पारशिवनी :- पारशिवनी तालुक्यातिल पेंच व्याघ प्रकल्प नागपुर च्या अधिनस्त धमेश पर्यटन संकुल येथे गुरुवार दिनांक  18.01.24 रोजी धनेश पर्यटन संकुल सुरेवाणी येथे बेरोजगार आदिवासी युवकासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रा तर्फे चारचाकी वाहन चालविण्याचे प्रशिक्षण एकुण 20 पीआरटी सदस्यांच्या पहिल्या तुकडीने सुरू झाले.

         आदिवासी भागातील स्थानिक रहिवाशांवर लक्ष केंद्रित करून हा उपक्रम रोजगार निर्मितीचा उद्देश चालविले आहे. यात समुदाय विकास आणि संवर्धनासाठी सर्वांगीण दृष्टीकोन दाखवून, बफर झोन क्षेत्रातील सर्व गावांपर्यंत सर्व समावेशक पोहोचावे हे त्याचे उद्देश्य असुन हे उल्लेखनीय वैशिष्ट्य आहे. अशी माहीती वन परिक्षेत्र अधिकारी श्री प्रविण लेले यांचे मार्गदर्शनात राबवणयात आले.