पंचायत समिती येथे पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग,मंत्रालय महाराष्ट्र शासनच्या राज्य पाणी व स्वच्छता मिशन (SWSM),मुंबई तर्फे प्रशिक्षण प्रारंभ…

    कमलसिंह यादव

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

        पारशिवनी:-दिनांक १९ जानेवारी २०२४ नागपुर जिल्हा परिषद अंतर्गत पंचायत समिती पारशिवनी येथे प्रशिक्षण पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग , मंत्रालय महाराष्ट्र शासन राज्य पाणी व स्वच्छता मिशन ( SWSM ), मुंबई तर्फे प्रारंभ झाला.

 

            स्वच्छ भारत मिशन (ग्रा.) जिल्हा परिषद नागपुर व पंचायत समिती पाराशिवनी यांच्या सहकार्याने व सद्भावना ग्रामीण विकास संस्था वर्धा मुख्य संसाधन संस्था ( KRC) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण कार्यक्रमात( SBM ) तालुकातील सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक , समिती सदस्य , स्वच्छागृही , अंगणवाडी सेविका , आशा वर्कर , बचत गट प्रतिनिधी यांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.

           यावेळी सौ.मंगलाताई निंबोणे सभापती पंचायत समिती पारशिवनी, करुणाताई भौवते उपसभापती पंचायत समिती पारशिवनी, सुभाष जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, चंद्रकांत देशमुख सहाय्यक गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, मूनेश दुपारे CRC पंचायत समिती पारशिवनी यांनी उपस्थित राहुन प्रशिक्षणात उपस्थितांना सभापती मंगला निबोने मॅडम व गटविकास अधिकारी सुभाष जाधव सर यांनी मार्गदर्शन केले.