पवनी येथील संघर्ष समितीच्या आंदोलनाला वंचित बहुजन आघाडीचा पाठिंबा…

     ऋग्वेद येवले

नागपूर विभागीय प्रतिनिधी

         पवनी- येथे दिनांक 16 जानेवारीपासून पवनी येथे उपजिल्हा रुग्णालयाचे काम सुरू करा या मागणीला धरून पवनी नागरिक संघर्ष समिती समिती तर्फे साखळी उपोषण सुरू आहे. या उपोषणाला पाठिंबा म्हणून वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्हा यांच्यातर्फे दिला असून पवनी येथे जाऊन त्यांनी पाठिंबाचे पत्र दिलेला आहे, पाठिंबा दिलेला आहे. 

          याप्रसंगी काम सुरू न झाल्यास 26 जानेवारीला आत्मदहन करणार आहेत त्यामुळे 26 जानेवारी च्या अगोदर उपजिल्हा रुग्णालयाचे बांधकाम सुरू करावे नाहीतर वंचित बहुजन आघाडी भंडारा जिल्ह्यामध्ये आंदोलन उभा करेल असे भंडारा जिल्ह्याचे जिल्हाअध्यक्ष धनपाल गडपायले ,जिल्हा संघटक डी जी रंगारी, जिल्हा महासचिव दिलीप वानखेडे, जिल्हा सल्लागार चरणदास मेश्राम,सदानंद रंगारी व इतर कार्यकर्ते याप्रसंगी उपस्थित होते.

            रुग्णालय उपजिल्हा रुग्णालय परभणी संदर्भात वारंवार पाहुणे नागरिक संघर्ष समितीतर्फे पाठपुरावा केला. त्या स्थानिक लोकप्रतिनिधी व प्रशासनाकडून जाणवपूर्वक दिरंगाई होत असल्यामुळे पवनी नागरिक संघर्ष समिती पदाधिकारी हे उपोषणाला बसलेले आहेत व 26 जानेवारी पर्यंत काम पूर्ण न झाल्यास आत्मदहन असा इशारा सुद्धा दिलेला आहे याकडे अधिकाऱ्यांनी लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले पाहिजे असे मत वंचित बहुजन आघाडीने व्यक्त केले आहे.