आंगणवाडी सेविकांच्या संपूर्ण मागण्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून शासन दरबारी सोडवण्यासाठी प्रयत्न करीन.:- शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांचे आंदोलन स्थळी भेटी प्रसंगी उद्गार.. — पालकमंत्र्यांच्या निवासस्थानी आक्रोश मोर्चा काढणार.:- पुणे जिल्हाध्यक्षा पूनमताई निंबाळकर..

 बाळासाहेब सुतार

निरा नरसिंहपुर प्रतिनिधी

        इंदापूर पंचायत समितीमध्ये चालू आसलेला आंगणवाडी सेविकांचा संप हा पुणे जिल्हाध्यक्षा पूनमताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शना खाली बेमुदत संप चालू आसुन या ठिकाणी शरद पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांनी भेट देऊन आंगणवाडी सेविकांच्या मागण्या व समस्या जाणून घेतल्या व भेटी प्रसंगी अध्यक्ष सागरबाबा मिसाळ बोलत आसताना म्हणाले की,आंगणवाडी सेविकांच्या ज्या मागण्या आसतील त्या सर्व मागण्या संसदरत्न खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या माध्यमातून सोडवण्याचा माझा प्रयत्न राहील. 

       तसेच राज्य शासनाने देखील यांची लवकरच दखल घेऊन आंगणवाडी शेविकाच्या मागण्या मंजूर कराव्यात.मी तुमचा भाऊ म्हणून इंदापूर तालुक्यातील सर्व आंगणवाडी सेविका ताईंच्या पाठीशी खंबीरपणे ऊभा आसुन सर्व मागण्या सोडवण्यासाठी इथुन पुढेही सर्व तो प्रयत्न करीनच व तुमच्या आंदोलनाला माझा देखील पाठिंबा राहील असे राष्ट्रवादी पक्ष शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष सागरबाबा मिसाळ यांचे भेटी प्रसंगी उद्गार काढले..

        महाराष्ट्र राज्य आंगणवाडी कर्मचारी संघ इंदापुर यथे 4 डिसेंबर 2023 पासून आंगणवाडी कर्मचारी बेमुदत संप सुरू आहे 15 डिसेंबर 2023 रोजी नागपूर येथे महा मोर्चा काढण्यात आला.पण कोणताही निर्णय झाला नाही.

         त्यानंतर इंदापुर येथे 1 जानेवारी 2024 रोजी जेलभरो आंदोलन करण्यात आले,त्यानंतर 3 जानेवारी 2024 रोजी आझाद मैदान येथे ठिय्या आंदोलन करण्यात आले 3 व 4 जानेवारी दोन दिवस राज्यातील लाखो महिला मुक्कामी आझाद मैदान येथे होत्या परंतु कोणताच ठोस निर्णय न मिळाल्याने राज्य उपाध्यक्ष श्री.निलेश दातखिळे व पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनमताई निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक 8 जानेवारी 2024 पासून प्रत्येक प्रकल्प कार्यालयात इंदापुर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. 

        या आंदोलनात रोज 50 ते 60 आंगणवाडी सेविका मदतनीस सहभागी होत आहेत . यावेळी पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनमताई निंबाळकर म्हणाल्या की आमच्या काही तुटपुंज्या मागण्या आहेत.

        परंतु शासन काहीच दखल घेत नाही.आंगणवाडी कर्मचारी यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा देण्यात यावा, मानधनात वाढ करावी सेविका 26 हजार व मदतनीस 22 हजार मानधन मिळावे, सेवानिवृत्त सेविका मदतनीस यांना पेन्शन चालू करावी,सुप्रीम कोर्टाच्या निकालानुसार सेविका व मदतनीस यांना ग्र्याजुईटी लागू करावी,लाभार्थी आहार दर वाढवावा या मुख्य मागण्या आहेत जर दिनांक 22जानेवरी पर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास 23 जानेवारी पासून पालक मंत्री यांच्या निवासस्थानी, मंत्रालय येथे आक्रोश मोर्चे काढण्यात येईल असे पुणे जिल्हा उपाध्यक्ष पुनमताई निंबाळकर यांनी सांगितले.

      यावेळी तालुक्यातील मोठया संख्येने आंगणवाडी सेविका,मदतनीस उपस्थित होत्या.