बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी…
पिंपरी तालुका इंदापूर पंचक्रोशीतील निरानदी व भिमा नद्यांच्या सर्व भागांमध्ये कडकची थंडी वाढली यामुळे गरम उभारा मिळण्यासाठी सर्व ठिकाणी शेकुट्या पेटु लागल्या.
उत्तर भारताकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे राज्यात कडाक्याच्या थंडीचा अनुभव येत असून तापमानात मोठी घट झाली आहे. सकाळ आणि रात्री गारठा अधिक जाणवत असल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. वाढलेल्या थंडीपासून बचाव करण्यासाठी शहरासह ग्रामीण भागातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्याचे चित्र दिसत आहे.
गावातील चौक, बसस्थानक, मंदिर परिसर तसेच चहाच्या टपऱ्यांवर लोक शेकोट्यांभोवती शेकोटी घेत असताना दिसून येत आहेत. शेतमजूर, प्रवासी आणि रस्त्यावरील व्यावसायिकांना या थंडीचा सर्वात जास्त फटका बसत असून, शेकोटी हा त्यांचा आधार ठरत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, “यंदा थंडीचा जोर जास्त जाणवत आहे. सकाळी ८ वाजेपर्यंत शेकोटी शिवाय बाहेर उभ राहण कठीण होत आहे” असे मत नागरिकांच्या वतीने व्यक्त केले.
दरम्यान, आरोग्य तज्ज्ञांनी नागरिकांना थंडीपासून बचावासाठी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. उबदार कपडे वापरणे, गरम पाणी पिणे, तसेच आवश्यक नसल्यास सकाळी लवकर व रात्री उशिरा बाहेर पडणे टाळावे, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.
पुढील काही दिवस थंडीचा कडाका कायम राहण्याची शक्यता वर्तवली असून नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही केले आहे.



