कमलसिंह यादव
तालुका प्रतिनिधी पारशिवनी
कन्हान :- शहरातील हनुमान मंदिर गांधी चौक येथे शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी आणि सकल हिंदु समाज कन्हान यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव विविध कार्यक्रमाने मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
शुक्रवार (दि.१५) ला सायंकाळी शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी आणि सकल हिंदु समाज कन्हा न यांच्या संयुक्त विद्यमाने श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्स वाची सुरूवात करून रात्री १२ वाजता विनोद यादव यांचा हस्ते भगवान श्रीकृष्ण मुर्तीची दही, दुधाने जला भिषेक करुन विधिवत पूजा अर्चना करण्यात आली.
आरती करुन श्रीकृष्णचा पाळणा हलवुन ढोल ताशा च्या गजरात फटाक्यांची आतिषबाजी करुन आनंदो त्सव साजरा करण्यात आला. “हाथी घोडा पालकी जय कन्हैया लाला की, श्री कृष्ण भगवान की जय ” चा जयघोष करण्यात आला. केक कापुन प्रसाद वितरण करण्यात आले.
शनिवार (दि.१६) ऑगस्ट ला सायंकाळी हनुमान मंदिर समोर बुंदी वितरण करुन श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात आला.
याप्रसंगी शिव पंचायत हनुमान मंदिर कमेटी अध्यक्ष मोहनसिंग यादव, लहु तिवारी, नंदलाल यादव, सकल हिंदु समाज कन्हान क्षेत्र अध्यक्ष शुभम बावनकर, ज्ञानेश्वर दारोडे, कँप्टन सतिश बेलसरे, अजय पाली, नारायण गजभिये, निलेश यादव, सुजल यादव, विनोद यादव, निलेश यादव, ओम यादव, शिव यादव, ऋषभ बावनकर, अमन यादव, शुभम यादव, किशोर यादव, आनंद शर्मा, पुर्वेश नाईक, हिमांशु कोसरे, सार्थक खंगारे सह भाविक भक्त मोठ्या संख्ये ने उपस्थित होते.



