Home Vidarbha पोलिस स्टेशनच्या परिसरात शांतता समितीची बैठक पोलिस निरिक्षक थोरात यांची अध्यक्षेत संपन्न..

पोलिस स्टेशनच्या परिसरात शांतता समितीची बैठक पोलिस निरिक्षक थोरात यांची अध्यक्षेत संपन्न..

    कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

पारशिवनी:- पारशिवनी तालुक्यातील पोलिस स्टेशन पारशिवनी येथे आज मंगलवार दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी पोलीस स्टेशन पारशिवनी येथे आगामी सण उत्सव पोळा, ताना पोळा, गणेशोत्सव, ईद-ए-मिलाद निमित्त पारशिवनी तालुका प्रशासनचे अधिकारी पोलीस स्टेशनची शांतता कमिटी ची सभा घेण्यात आली. 

        या प्रसंगी पारशिवनी शहर व ग्रामिण भागातील गणेश उत्सव आयोजक कमेटी, पोलिस स्टेशन च्या ग्रामिण भागातील हद्दीतील पोलीस पाटील, गावागावातील पोळा आयोजक कमेटी व तन्हा पोळा उत्सव समीतीचे कार्यकर्ता यांची बैठक आयोजित करण्यात आली होती.

       सदर बैठकीमध्ये पोलीस निरीक्षक राजेश कुमार थोरात पोलीस स्टेशन पारशिवनी, माननीय सुभाष जाधव गटविकास अधिकारी पंचायत समिती पारशिवनी, अभियंता महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण महामंडळ पारशिवनी चे प्रतिनिधी, नगरपंचायत पारशिवनी चे वरिष्ठ प्रतिनिधी, सार्वजनिक बांधकाम विभाग पारशिवनी चे प्रतिनिधी यांनी मार्गदर्शन केले.

       सदर वेळी वरिष्ठांनी दिलेल्या सूचना व परिपत्रकाप्रमाणे मार्गदर्शन करण्यात आले असून आगामी सण उत्सव शांततेत पार पडण्याबाबतचे आवाहन करण्यात आलेले से – आहेत तसेच पोलीस पाटील यांना गावातील प्रत्येक कार्यक्रमाची परवानगी घेण्याकरिता आयोजकांना सूचना द्याव्यात व इत्यंभूत कार्यक्रमाची परवानगी घेऊनच कार्यक्रम राबविण्याबाबतच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. 

          कार्यक्रमाचे संचालन गोपनिय विभागाचे पो सि पृथ्वीराज चौहान यांनी केले.