ग्रीनफ्रेंड्सतर्फे स्वतंत्रदिनाच्या निमित्ताने ‘नेचर पार्क’ वर वृक्षारोपण… स्व.अरविंद गायधने यांची पुण्यतिथी निमित्ताने सुद्धा वृक्षारोपण…

चेतक हत्तीमारे 

प्रतिनिधी

लाखनी:-

    ग्रीनफ्रेंड्स नेचर क्लबने लाखनी बसस्थानकावर तयार केलेल्या “नेचर पार्क” वर स्वातंत्र्य दिन तसेच स्व.अरविंद गायधने यांच्या पुण्यतिथी निमित्ताने वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला.

   यावेळी स्व.अरविंद गायधने यांचे पुण्यतिथी निमित्ताने वृक्षारोपण करून त्यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करून आदरांजली वाहण्यात आली.

 विशेषतः रक्तचंदन व शमीपत्र वृक्षाचे वृक्षारोपण यावेळी करण्यात आले.

कार्यक्रमाला ग्रीनफ्रेंड्सचे प्रा.अशोक गायधने,से.नि. प्राचार्य प्रकाश वंजारी,इंजि.जागेश बडवाईक,सार्वजनिक बांधकाम विभाग लाखांदूरचे कार्यकारी अभियंता रजत अटकरे,से.नि. प्राचार्य माणिक निखाडे, वीणा गायधने, ज्योती वंजारी, निशा बडवाईक,आयुषी गायधने, शालू वंजारी,प्रथमेश गायधने,अथर्व गायधने, दिनेश गिर्हेपुंजे इत्यादींनी कार्यक्रमास उपस्थिती दर्शविली.