माजी प्रधानमंत्री स्व.श्री राजीव गांधी यांचा जयंती निमिताने सदभावना दिवस साजरा. — युथ कांग्रेस तर्फे कुलदीप मंगल कार्यालय कन्हान येथे कार्यक्रम संपन्न. ..

 

कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधी पारशिवनी 

 

पारशिवनी:-

         माजी प्रधानमंत्री स्व.श्री. राजीव गांधी यांची जयंती सदभावना दिवस म्हणून कुलदीप मंगल कार्यालय येथे युथ काँग्रेस तर्फे साजरी करण्यात आली. 

        जयंतीचा कार्यक्रम युथ कांग्रेस कार्यकर्त्यांनी आयोजित केला होता.समस्त कन्हान मधील युथ काँग्रेसचे पदाधिकारी व युथ काँग्रेस सदस्य सदर कार्यक्रमाला उपस्थित होते.

       सदभावना दिवस यशस्वी करण्याचे आव्हान कार्यक्रमाचे आयोजक नागपूर जिल्हा स्तरीय युथ काँग्रेस पदाधिकारी तर्फे रोहित नरेश बर्वे. (युथ काँग्रेस नागपूर जिल्हा महासचिव )निखिल पाटील (युथ काँग्रेस रामटेक विधानसभा अध्यक्ष),सोहेल सय्यद (युथ काँग्रेस उपाध्यक्ष कन्हान शहर ) यांनी केले होते.

          सदभावना दिवस यशस्वी ठरल्याचे समाधान युथ कांग्रेस पदाधिकारी व कार्यकर्त्यांमध्ये स्पष्ट दिसून येत होते.