या पुढे “स्वर्गरथ” सेवा निशुल्क….  — नगराध्यक्ष “श्री स्वप्नीलजी कावळे याचा सेवाभावी निर्णय…

जिल्हा प्रतिनिधी

अमान क़ुरैशी

दखल न्यूज भारत

 

चंद्रपुर:सिंदेवाही

  शहरातील कुणाच्याही घरी आकस्मिक असो वा आजारपणामुडे असो किंव्हा कोणत्याही कारणाने मयत झाल्यास आता नगर पंचायत तर्फे स्वर्गरथ सुविधा मोफत देण्याचा निर्णय नगराध्यक्ष स्वप्नील कावळे यांनी दिनांक 20 जून 2023पासून घेतला असून यापुढें कुठलेही शुल्क आकारण्यात येणार नसल्याचे त्यांनी सांगितले आहे 

  सविस्तर असे की,याआधी स्वर्गरथकरिता नगर पंचायत तर्फे 700रु नाममात्र शुल्क आकारण्यात येत होते मात्र यापुढे स्वर्गरथ करिता लागणारा खर्च हा स्वता नगराध्यक्ष स्वप्नील कावळे हे या पदावर असेपर्यंत करणार असून त्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा सर्वच स्तरातून स्वागत होत असून त्यांच्या या कार्याला नगर पंचायत च्या सर्वच सदस्यांनी देखील या निर्णयाचे स्वागत केले आहे या आधी सुद्धा स्वप्नील कावळे यांनी अनेक सामाजिक कार्य केले असून त्यात प्रामुख्याने कोरोना काळातील त्यांचे रुग्णांना केलेली तात्काळ मदत तसेच उन्हाळ्यात पाण्याची टंचाई लक्षात घेत टँकर ने प्रत्येक प्रभागात पाणीपुरवठा करणे असे अनेक उपक्रम राबविले आहेत आणि आता त्यांनी घेतलेल्या 20 जून 2023 पासून मोफत स्वर्गाथाचा निर्णय यातून समाजातील गोरगरीब जनतेला होणारी मदत यामुडे त्यांचे समाजकार्याबद्दलची तळमळ दिसून येत आहे याचा लाभ सिंदेवाही, लोणवाही आंबोली या नगरपंचायत हद्दीतील सर्व नागरिकांना होणार असून याची सूचना आरोग्य विभागास सुध्धा देण्यात आल्या आहेत.त्यांच्या या कार्याचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे.