Home Vidarbha कुरखेडा बसस्थानक रामभरोसे…

कुरखेडा बसस्थानक रामभरोसे…

राजेंद्र रामटेके

विशेष प्रतिनिधी..

     कुरखेडा बसस्थानकाला भेट दिली असता या कार्यालयात कोणतेही कर्मचारी उपस्थित नसल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आदिवासी सेल गडचिरोली जिल्हाध्यक्ष मोहन पुराम यांना आढळून आले.यामुळे सदर बसस्थानक रामभरोसे असल्याचे दिसून आले.

       प्रवाशाचे म्हणणे आहे की, कुणीच ऐकत नाही,कोरचीचे प्रवासी व इतरही प्रवासी एकमेकांना विचारत असतात,बस केव्हा सुटणार? बस वेळेवर धावत नसतील तर,मग प्रश्न पडतो कर्मचारी कसासाठी?

        कोरची नागपूर बसचा थांबा रामगडला देण्यात यावे,अन्यथा आंदोलन केले जाईल व जे कर्मचारी उपस्थित नव्हते त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी,अशी मागणी करण्यात येईल असे मोहन पुराम जिल्हाध्यक्ष रा.का,आदिवासी आघाडी यांचे म्हणणे आहे.