Home देशविदेश RSS प्रणित भाजप केंद्र सरकारच्या काळात गुजराती ठकानेच,”गुजराती मोदी / शहाच्या व्यवस्थेला...

RSS प्रणित भाजप केंद्र सरकारच्या काळात गुजराती ठकानेच,”गुजराती मोदी / शहाच्या व्यवस्थेला चुना लावला!…. — गेल्या बारा वर्षात देशातील राजकीय मुत्सदेगिरी अपयशी…

     PMO ( Prime Minister Office ) प्रधानमंत्री कार्यालयातील अतिरिक्त निर्देशक ( Additional Director ) किरण पटेल (IAS ) जम्मू काश्मीरच्या तीन दिवसीय दौऱ्यावर जाण्यासाठी 25 आक्टोबर 2022 (25, 26, 27 ) रोजी विमानाने आपल्या पत्नी आणि मुलीसहित श्रीनगरच्या विमानतळावर पोहोचतात. प्रोटोकॉलनुसार पुलवामाचे डेप्युटी कमिश्नर बशीर – उल – हक त्यांना रिसिव्ह करण्यासाठी जातात. 

        श्रीनगरमधील ललित ग्रँड पंचतारांकित हॉटेलमध्ये त्यांची बडदास्त केली जाते ( अर्थात शासकीय खर्चाने ). त्या हॉटेलमध्ये पोहचल्यानंतर किरण पटेल साहेबांच्या दौऱ्यासाठी विशेष सुरक्षा दलाचे 12 कमांडर दिमतीला दिले जातात. 

         दोन बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ गाड्या दिल्या जातात.जम्मू काश्मीरचे स्थानिक भाजपा नेते मंजूर भट यांच्याशी चर्चा होते.प्रेस काँफरन्स सुद्धा साहेब घेतात.दौऱ्याचे निमित्त सांगून पुढील तीन दिवस ते कुटुंबासहीत जम्मू काश्मीर मधील विविध भागाचा दौरा आटोपून 27 फेब्रुवारी रोजी श्रीनगरवरून सरळ अहमदाबादला विमानाने रवाना होतात.

          त्यानंतर अवघ्या साढेतीन महिन्यानंतर 6 फेब्रुवारी 2023 रोजी पुन्हा तीन दिवसाच्या किरण पटेल साहेब जम्मू काश्मीरच्या दौऱ्यावर येतात.याहीवेळी ते डेप्युटी कमिशनर चौधरी यांना सूचना देऊन मागच्या वेळेप्रमाणेच याहीवेळी 12 कमांडर आणि दोन बुलेटप्रूफ गाड्यांचा ताफा पाठवण्यास सांगतात. 

        यावेळी मात्र त्यांच्यासोबत हिऱ्याचे व्यापारी अमित पांड्या ( यांचे वडील नितेश पांड्या हे गुजरात सरकारमधील C. M. O. कार्यालयातील अतिरिक्त PRO म्हणून कार्यरत असतात ) हे सोबत असतात. 

         यावेळी किरण पटेल साहेब चौधरी साहेबांसोबत विविध ठीकाणी बैठकीचे प्रेझेंटेंशन देतात.श्रीनगरमध्ये स्मार्ट टॉवर बनविण्यासाठीची IAS IPS अधिकाऱ्यांची औपचारिक मिटिंग सुद्धा घेतात.

         त्यानंतर भारत पाकिस्तानच्या बॉर्डरवरील चेकपोस्ट असलेल्या अमन सेतू ची सुद्धा पाहणी करतात.तिथे अनेक फोटो काढून आपल्या सोशल मीडियावर आणि आपल्या ट्विटर हॅण्डलवर सुद्धा व्हायरल करतात.शेवटी तीन दिवसाचा दौरा आटोपून 8 फेब्रुवारी रोजी श्रीनगरहून विमानाने अहमदाबादला पोहोचतात.

         त्यानंतर किरण पटेल साहेबांचा पुन्हा तिसऱ्यांदा जम्मू काश्मीर दौरा निघतो. 24 ते 28 फेब्रुवारी 2023 यावेळी सुद्धा बशीर उल – हक चौधरी डेप्युटी कमिशनर ( IAS ) यांना सूचना देऊन तोच ताफा,त्याच दोन गाड्या,तोच लवाजमा पाठविण्याची सूचना करतात. आता साहेबांसोबत डॉ.हार्दिक चंदाना,अमीत पांड्या असतात.

         आता उपायुक्त चौधरी यांच्यासोबत तसेच इतर IAS,IPS अधिकाऱ्यांसोबत विवीध विषयावर चर्चा करतात.जयसीतापारा स्टीलचे व्यापारी,कोल्ड स्टोअरच्या निर्मितीची कल्पना पुढे करून त्याविषयी प्रयत्न करण्याची शिफारस किरण पटेल यांच्याकडे करतात.त्याचप्रमाणे बडगावचे IAS अधिकारी असलेले मिंग शेरपा एका जुन्या संतूर हॉटेलच्या जीर्णोद्धाराची कल्पना पुढे करून ती सुद्धा मागणी किरण पटेल साहेबांकडे बोलून दाखवतात.

       शेवटी हा चार दिवसाचा सरकारी दौरा आटोपून 28 फेब्रुवारी रोजी श्रीनगरहून विमानाने पुन्हा अहमदाबादला पोहोचतात. 

       त्यानंतर चौथा दौरा साहेबांचा 2 मार्च 2023 रोजी पुन्हा येतो. नेहमीप्रमाणे साहेब तेच ललित ग्रँड हॉटेल,तोच 12 कमांडरचा ताफा, त्याच दोन बुलेटप्रूफ स्कॉर्पिओ,अशाच भेटी,अशीच प्रेस्कॉन्फ्रेस सर्व काही अगदी तसेच प्रभावशाली.

         परंतू यावेळी एक नवीन बडगावचे डेप्युटी कमिशनर असलेले IAS अधिकारी फकरूद्दीन हमीद यांना या किरण पटेल यांच्या बॉडी लँग्वेजवरून पहिल्यांदा शंका येते. 

        मात्र ही शंका ते कुणालाही बोलून न दाखवता PMO कार्यालयातील सर्वच रँकच्या IAS अधिकाऱ्यांच्या यादीत किरण पटेल नावाची तपासणी करतात.कुठेही किरण पटेल नाव त्यांना सापडत नाही. त्यांना आश्चर्याचा धक्काच बसतो!…

       साहेबांचे आतापर्यंत चार दौरे होऊन गेलेले होते.चारही दौऱ्यात कुणालाच शंका कशी आली नाही? 

   एकाच साहेबाचे केवळ सहा महिन्यात चार दौरे तेही एकाच राज्यात!

      फकृद्दीन हमीद (डेप्युटी कमिशनर बडगाव ) यांना मात्र सर्व समजले.लगेच थोड्याच दिवसात किरण पटेल साहेबांचा पुन्हा पाचव्यांदा श्रीनगर दौरा आला. 

         त्यांना विमानतळावरून तोच ताफा,त्याच गाड्या,तेच बारा कमांड,तेच ललित ग्रँड हॉटेल मिळवून दिला.आणि मग हॉटेल मध्ये गेल्यानंतर किरण पटेलचे भांडे फोडून एस.पी.साहेबांनी अटक करून पोलिसांची खातेरदारी केली.पुढे गुजरातमध्ये पाठवून न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली.आता किरण पटेल गुजरातचे तिसरे ठग ( मोदी / शहा पहिले आणि दुसरे) तुरुंगात आहेत.

     हे असेकसे घडले?,याचा एक इतिहास आहे…

        जेंव्हा फेब्रुवारी 2022 मध्ये जम्मू काश्मीरमध्ये अमरनाथ यात्रेच्यावेळी भुस्खलन झाले होते.त्यावेळी बचावकार्याची व पथकांची जबाबदारी एक IAS अधिकारी असलेले पहलगामचे डेप्युटी कमिशनर म्हणून बशीर -उल – हक हे तिथे प्रमुख होते.त्या अमरनाथ यात्रेत RSS चे प्रमुख राष्ट्रीय कार्यकर्ते असलेले त्रिलोकसिंग चव्हाण हे त्यात अडकलेले होते.त्यांना सुखरूप बाहेर काढण्यासाठी खूप मोठे परिश्रम बशीर उल – हक चौधरी साहेबांनी घेतले होते. 

         त्यावेळी पत्रकारांशी बोलताना बशीर साहेब त्रिलोकसिंग चव्हाण साहेबांना म्हणाले की आपण दिल्लीत आहात,एखाद्या दिल्लीतील बड्या अधिकाऱ्यांची ओळख तरी करून द्या म्हणजे आम्हांला आमची नडलेली कामे करता येतील.जाहीर आहे की भाजपाचे राज्य सरकार असो की केंद्र सरकार असो ते RSS प्रणित असल्याने मंत्र्यापेक्षा दबदबा RSS च्या पदाधिकाऱ्याचा जास्तच असतो. 

       या अनुषंगाने चौधरी साहेबांनी त्रिलोकसिंग चव्हाण साहेबांकडे गळ घातली.अवघ्या थोड्याच दिवसात त्रिलोकसिंग चव्हाण साहेब आणि किरण पटेल यांची भेट झाली. हलाखी यांची एकमेकांची ओळख 2016 पासून होती.परंतू किरण पटेलची असलीयत मात्र त्रिलोक सिंग चव्हाण यांना ठाऊक नव्हती.

         जेंव्हा त्रिलोक सिंग चव्हाण आणि किरण पटेलची जुलै 2022 मध्ये भेट झाली,त्यावेळी किरण पटेलनी सांगितले की मी PMO कार्यालयात ऍडिशनल डायरेक्टर या पदावर आहे. 

         परंतू तुम्ही मला एखाद्या जम्मू काश्मीरच्या वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांची ओळख करून द्या.म्हणजे आमची नडलेली कामे होतील.तेंव्हा त्रिलोक सिंग चव्हाण साहेबांना वाटले की किरण पटेल म्हणतोय की मला श्रीनगरच्या वरिष्ठ प्रशासकीय बड्या अधिकाऱ्यांची ओळख करून द्या.तिकडे चौधरी म्हणतात की मला दिल्लीच्या बड्या अधिकाऱ्यांची ओळख करून द्या.लगेच अवघ्या कांही दिवसात त्रिलोकसिंग चव्हाण बशीर उल – हक – चौधरी यांची किरण पटेल यांच्याशी ओळख करून देतात.तेंव्हा फर्जी कार्ड किरण पटेल,चौधरी यांना देतो.

      आणि तिथून पुढे……

  वरील सत्य पण नाटकी इतिहास घडतो……..!

      विचार करा हाच किरण पटेल जर मुस्लिम असता आणि गुजरातचा नसता तर….

      हाच किरण पटेल जर पाकिस्तानचा जासूस असता तर….

      त्याने जे LOC च्या अमन सेतू चेक पोस्टवर जाऊन फोटो व्हिडीओ काढलेले पाकिस्तानच्या हाती लागले असते तर…

       एक ठग एक सरकारी वरिष्ठ अधिकारी म्हणून येतो एकदा नव्हे दोनदा नव्हे तर चार यशस्वी दौरे करतो.त्या दौऱ्यात IAS, IPS रँक अधिकाऱ्याच्या बैठका घेतो.प्रेसकॉन्फ्रेस घेतो.आमच्या प्रशासकीय ब्युरोक्रॅसीला आव्हान करतो.आमच्या सर्व IAS, IPS अधीकाऱ्यांची बुद्धी भेदून जातो….

       याला काय म्हणावे? UPSC च्या अभ्यासक्रमात किरण पटेलच्या पात्राची बुद्धीमता ओळखण्याची शक्ती आहे का?

      हे आहे RSS प्रणित केंद्र सरकार आणि राज्य सरकार असलेले महाराष्ट्र राज्य!…

        जेंव्हा जेंव्हा या देशात भाजपचे सरकार आले 1998 आणि 1999 ते 20004 यांच्याच कार्यकाळात कंदहार विमान अपहरण प्रकरण घडले,ज्यामध्ये मौलाना मसुद अझहर या कुख्यात अतिरेक्याला पैसे देऊन सोडावे लागले भारतीय नागरिकांना सोडविण्यासाठी!

       आज महाराष्ट्रात आणि देशात कितीतरी किरण पटेल आजही वावरताना दिसतात.आता त्यांना RSS प्रणित सरकारचे अभय आहे.

       तेंव्हा 2029 मध्ये RSS प्रणित केंद्र व राज्य सरकारे घालविण्यासाठी मतदारांच्या हातात शेवटची संधी!

        त्यासाठी EVM कायमचे हटवून बॅलेट पेपरवरच मतदान करणे.हा आमचा आता जन्मसिद्ध हक्क आहे. तो आम्ही भारताचे लोकं मिळविणारच…..

लेखक आणि आवाहनकर्ता…. 

          अनंत केरबाजी भवरे..

संविधान विश्लेषक,रेणापूरकर,औरंगाबाद, 7875452689…