Home Social चिमूर येथील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा बरोबर होत नसल्याबाबत मुख्याधिकारी यांना मो.शफीक...

चिमूर येथील नागरिकांना नळाद्वारे पाणी पुरवठा बरोबर होत नसल्याबाबत मुख्याधिकारी यांना मो.शफीक उर्फ पप्पूभाई शेख यांनी दिले निवेदन…. — अन्यथा घागर मोर्चा….

शुभम गजभिये 

विशेष प्रतिनिधी…

          एम.जी.पी.मार्फत पाणी पुरवठा योजना ५४ कोटी रुपयांची मंजूर झाली व सदर योजना अंतर्गत कामे चिमूर नगरपरिषद हद्दीत करण्यात आली.परंतु एम.जी.पी.मार्फत पाणीपुरवठा योजनांतंर्गत नळाची काही कामे शिल्लक असल्याने अजुनही या योजनांतर्गत नळाला पुरेसा पाणी पुरवठा होत नाही.

        तद्वतच जुने नळ कनेक्शन बंद करण्यात आल्याने चिमूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना पाणीपुरवठा करण्यास अळचणी उद्भवल्या आहेत.

          नवीन पाणी पुरवठा योजना अंतर्गत काही वार्डातील नागरिकांना पुरेसे पाणी मिळत आहे तर काही वार्डातील नागरिकांना अल्प प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे.

         यामुळे जुने नळ कनेक्शन परत सुरु करुन चिमूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा अशी मागणी समाजसेवक मो.शफीक उर्फ पप्पुभाई शेख यांनी मुख्याधिकारी चिमूर यांना निवेदनाद्वारे केली आहे.

         चिमूर नगरपरिषद हद्दीतील काही वार्डात सुरळीत व आवश्यक पाणी पुरवठा होत नसल्याने तेथील महिला-पुरुष भयंकर त्रस्त झाले आहेत.

            याचबरोबर अपुऱ्या पाणी पुरवठ्याचा नाहक त्रास चिमूर येथील नागरिकांना होत असल्याने नागरिक चांगलेच वैतागले असल्याचे मो.शफीक उर्फ पप्पुभाई शेख यांचे म्हणणे आहे.

        चिमूर नगरपरिषद हद्दीतील नागरिकांना सुरळीत पाणीपुरवठा तात्काळ सुरू करण्यात आला नाही तर नगरपरिषद कार्यालयावर घागर मोर्चा मोठ्या प्रमाणात काढण्यात येईल असा इशारा निवेदनातून मो.शफीक उर्फ पप्पुभाई शेख यांनी मुख्याधिकारी चिमूर यांना दिला आहे.

        निवेदनाच्या प्रती आमदार किर्तीकुमार भांगडीया व चंद्रपूर जिल्हाधिकारी यांना पाठविण्यात आल्या आहेत.