Home कृषी तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा…

तालुक्यातील शेतकऱ्यांनी पिक स्पर्धेत सहभाग घ्यावा…

     सुधाकर दुधे

सावली तालुका प्रतिनिधी 

         बरेच शेतकरी शेतपीक उत्पादन वाढविणे करीता नवनव्या तंत्रज्ञानाचा व कल्पकतेचा वापर करून शेतीत प्रयोग करीत असतात अश्या प्रयोगशील शेतकऱ्यांना चालना मिळून त्यांनी अधिक उमेदीने शेती कार्य कारणे करीता तसेच त्यांनी उत्पादन वाढीकरिता अवलंबलेल्या तंत्रज्ञानाचा परिसरातील इतरही शेतकऱ्यांना फायदा होण्याचे दृष्टीने, राज्यात कृषि विभागाचे वतीने अन्नधान्य, कडण्या व गळीत धान्य पिकांकारिता तालुका, जिल्हा व राज्य स्तरावर पिक स्पर्धेचे आयोजन प्रती वर्षी करण्यात येते. सन 2025-26 खरीप हंगामातही सदर योजनेचे आयोजन करण्यात येत आहे. 

         सदर योजनेत तालुका स्तर, जिल्हा स्तर व राज्य स्तरावर पहिले पहिले बक्षीस अनुक्रमे 5000/-, 10000/- व 50000/- तसेच दुसरे बक्षीस अनुक्रणे 3000/-, 7000/- व 40000/- तर तिसरे बक्षीस अनुक्रमे 2000/-, 5000/- व 30000/- विजेत्या शेतकऱ्यांना देण्यात येणार आहे.

          सदर योजनेत सहभागी होण्याकरिता शेतकऱ्याचे नावे शेती असणे आवशक असून ती स्वतः कसणे आवशक आहे तर लागवड केलेले पिक सलग किमान एक एकर असणे आवश्यक आहे. योजनेत सहभागी होने करीता भात पिका करिता 30 ऑगस्ट 2025 परेंत मुदत असून स्पर्धेत भाग घेण्यासाठी 7/12, 8 अ उतारा, पिक स्पर्धे करीता घोषित क्षेत्राचा चिंहांकित नकाशा, अनु जमाती शेतकरी यांचेकरिता जात प्रमाणपत्र, बँक पासबुक, आधार कार्ड इत्यादी कागदपत्रे आवशक आहेत.तसेच शेतकऱ्यांनी फार्मर आय. डी. काढलेले असणे आवश्यक आहे. अनु जमाती शेतकऱ्यांना 150/- तर इतर शेतकऱ्यांना 300/- एवढी सहभाग फी भरावी लागणार आहे.

          हंगामाचे सुगीचे वेळी क्षेत्रीय कृषि अधिकारी यांचे मार्फत व ग्राम कृषि समिती चे समक्ष पिक कापणी प्रयोग घेऊन उत्पादनावर आधारित एकक क्षेत्रात अधिक उत्पादन घेणाऱ्या सहभागी शेतकऱ्यांची विजेता म्हाणून निवड करण्यात येईल.

         सदर योजनेत अधिकाधिक शेतकऱ्यांना लाभ घ्यावा तथा अधिक माहीती करीता आपले क्षेत्राचे सहायक कृषि अधिकारी ( कृषि सहायक), उप कृषि अधिकारी ( कृषि पर्यवेक्षक) किंवा मंडळ कृषि अधिकारी यांचेशी संपर्क करावे. 

       असे आव्हान तालुका कृषि अधिकारी ललित राऊत यांनी केले आहे.