Home सांस्कृतिक माऊलींच्या चांदीची नुतन पालखी व दरवाजा पुजन सोहळा संपन्न…

माऊलींच्या चांदीची नुतन पालखी व दरवाजा पुजन सोहळा संपन्न…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी : संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळ्यातील पालखीला व पंखा मंडपातील दरवाजाला नवीन चांदी अर्पण करण्यात आली असून सदर पालखीची व दरवाजाचे विधीवत पूजन कारंजा मंडपात करण्यात आले. चांदीची नुतून पालखी नांदेड येथील सुमित मोरगे व चांदीच्या दरवाजा साठी परभणी येथील श्रीराम माणिकराव मसलेकर यांनी देणगी दिली आहे.

        यावेळी प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, पालखी सोहळा प्रमुख डॉ.भावार्थ देखणे, विश्वस्त चैतन्य महाराज कबीर, ॲड.राजेंद्र उमाप, पुरुषोत्तम महाराज पाटील, ॲड.रोहिणी पवार, व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, मानकरी बाळासाहेब कुऱ्हाडे पाटील, योगेश आरु, बबनराव कुऱ्हाडे, रोहीदास तापकीर, विलास घुंडरे, ॲड.रंगनाथ रानवडे, नंदकुमार कुऱ्हाडे, अजित वडगावकर, रमेश गोगावले, नंदकुमार वडगावकर उपस्थित होते.