Home शैक्षणिक उन्हाळी सुट्टी नंतर पहिल्याच दिवशी शिक्षक व ग्रामस्थ यांच्या हस्ते फुलांचा गुच्छ...

उन्हाळी सुट्टी नंतर पहिल्याच दिवशी शिक्षक व ग्रामस्थ यांच्या हस्ते फुलांचा गुच्छ देऊन विद्यार्थ्यांचे उत्साहात स्वागत. — विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीस संचालक श्रीकांत बोडके व ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके यांनी शुभेच्छा दिल्या…

 बाळासाहेब सुतार 

नीरा नरसिंहपूर प्रतिनिधी 

पिंपरी बुद्रुक तालुका इंदापूर येथील लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाचा सोमवार दिनांक 16 रोजी उन्हाळी सुट्टीनंतर पहिलाच दिवस आसल्यामुळे संस्थापक अध्यक्ष सुभद्राबाई बोडके, प्रभाकर बोडके, बबन बोडके, संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके, विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके,उपसरपंच संतोष सुतार, मा. ग्रामपंचायत सदक्ष समाधान बोडके, मा.ऊपसरपंच पांडुदादा बोडके, पोलीस पाटील वर्धमान बोडके, सह सर्व ग्रामस्थ व शिक्षकांनी विद्यार्थ्यांचे फुलांचा गुच्छ देऊन उत्साहात स्वागत करण्यात आले.

      प्रवेश घेतलेल्या नवीन विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभ कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित राहून विद्यार्थ्यांचे स्वागत केले. तसेच, विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या शालेय साहित्यांचे वाटतही करण्यात आले. व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

     लोकनेते महादेवराव बोडकेदादा विद्यालयाची गुणवत्ता उंचावून विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून गावाचे नाव उज्वल होईल. तसेच, भावी पिढीला योग्य दिशा देऊन गावाची ओळख निर्माण करता येईल.असेही मत सहकार महर्षि साखर कारखाना संचालक श्रीकांत बोडके यांनी यावेळी व्यक्त केले. 

      शाळेचा पहिलाच दिवस असल्याने मुलांच्या चेहऱ्यावर आगामी शालेय वाट चालीबद्दलचा आनंद स्पष्ट दिसत होता.

       या प्रसंगी संस्थापक अध्यक्षा श्रीमती सुभद्राबाई बोडके, प्रभाकर बोडके, बबन बोडके, संचालक श्रीकांत बोडके, माजी सरपंच ज्योती बोडके,विद्यमान सरपंच भाग्यश्री बोडके, उपसरपंच संतोष सुतार, पोलीस पाटील वर्धमान बोडके, पांडुदादा बोडके, मा.ग्रामपंचायत सदस्य समाधान बोडके, मुख्याध्यापक बीपी कोरटकर, केंद्रप्रमुख साबळे सर, सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी  व पालक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.