बाळासाहेब सुतार
निरा नरसिंहपुर प्रतिनिधी
इंदापूर तालुका इंदापूर येथील शहरातील प्रभाग क्रमांक 5 मध्ये भार्गवराम तलाव येथे राज्यांचे उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास मंत्री एकनाथराव शिंदे साहेब व जिल्हाध्यक्ष,महेशदादा पासलकर यांच्या माध्यमातून वैशिष्ट्यपुर्ण योजनेंतर्गत बगीचा सुशोभीकरण करण्यासाठी 1कोटी रुपये निधीची तरतुद करून मंजूर करण्यात आलेला असुन या कामांचे भुमीपूजन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पुणे जिल्हाध्यक्ष प्रदिपदादा गारटकर, शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडीच्या सौ सिमा प्रशांत कल्याणकर, इंदापूर शिवसेना शहर प्रमुख अँड आनंद केकाण यांच्या या सर्वांच्या उपस्थितीत भूमिपूजन करण्यात आले.
यावेळी इंदापुर शहरातील माजी नगराध्यक्ष,नगरसेवक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेब व जिल्हाध्यक्ष महेश दादा पासलकर यांच्या प्रयत्नामुळे इंदापूर तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी विकास कामासाठी मंजूर करून दिल्याबद्दल शिवसेना जिल्हाप्रमुख महिला आघाडी सीमा प्रशांत कल्याणकर यांनी इंदापूर तालुक्याच्या वतीने आभार व्यक्त केले.




