दिनेश कुऱ्हाडे
उपसंपादक
आळंदी : “आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरात विठ्ठलाचरणी लीन होण्यासाठी राज्याच्या कानाकोपऱ्यातून जाणाऱ्या वारकऱ्यांना आता पावसात भिजावे लागणार नाही. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पावसापासून बचाव करण्यासाठी वारकऱ्यांना रेनकोट भेट दिले. आळंदीतील साई मंगल कार्यालय येथे एक लाखाहून अधिक वारकऱ्यांना रेनकोटचे वितरण केले आहे.
यावेळी भाजपाचे शहराध्यक्ष व अलंकापूरी प्रतिष्ठानचे अध्यक्ष किरण येळवंडे, गणेश गरुड, ज्ञानेश्वर बनसोडे, सचिन मिठे तसेच इतर स्वयंसेवकांनी रेनकोट वितरणाची मोहीम हाती घेतली आहे.”
आतापर्यंत सुमारे एक लाखाहून अधिक वारकऱ्यांना रेनकोटचे वितरण विविध पालख्यांमधील वारकरी बांधवांना करण्यात आले असून एकूण साडेपाच लाख रेनकोटचे वितरण पालखी मार्गस्थ होण्यापूर्वी करण्यात येणार आहे. विठुरायाच्या ओढीने आषाढी वारीसाठी पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पाच लाख वारकऱ्यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून रेनकोटचे वाटप करण्यात आले. वारकऱ्यांना पालखी सोहळा सुरु होण्यापूर्वीच रेनकोट मिळाल्याने वारकऱ्यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले आहे.



