सत्रापुर नवनिर्मित रेल्वे अंडरपास पुलामध्ये साचले पावसाचे पाणी, नागरिक त्रस्त… — रेल्वेने अंडरपास पुल पाणी निकासी व विद्युत व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी…

     कमलसिंह यादव 

तालुका प्रतिनिधि पारशिवणी 

         कन्हान : – सत्रापुर , सिहोरा ला ये-जा करण्यारा रस्ता बीकेसीपी शाळेपासुन रेल्वे फाटक बंद करुन रेल्वे ने कन्हान सत्रापुर नवीन आरयुबी रेल्वे अंडरपास पुल मागील वर्षी आॅक्टोंबर महिन्यात सुरू केले होते . पहिल्याच दिवशी पावसाचे साचल्याने नागरिकांनी पाणी निकासी व पर्याप्त विद्युत व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी केली होती . परंतु रेल्वे प्रशासना ने या गंभीर समस्या कडे दुर्लक्ष केल्याने रेल्वे अंडरपास पुला मध्ये पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचल्याने नागरिकांना पाण्यातुन पायदळ व वाहनाने ये-जा करून भयंकर त्रास सहन करावा लागत आहे .

           एका वर्षा पुर्वी नागपुर जबलपुर राष्ट्रीय महामार्गा वरील कन्हान नदी नविन पुलाचे लोकार्पण करून वाहतुकीस सुरू करण्यात आल्याने १५० वर्ष जुना ब्रिटिश काळातील कन्हान नदी पुलावरून वाहतुक बंद झाल्याने रेल्वे प्रशासना ने रेल्वे मार्गावरील मनुष्य बळ कमी करण्यास व फाटक सहित रेल्वे मार्ग करण्यास रेल्वे मार्गावरील रस्त्या करिता ओव्हरब्रिज व अंडरब्रिज बनविण्याची मोहिम राबविली होती.

         मागील वर्षी ऑक्टोंबर महिण्यात कन्हान येथुन सत्रापुर सिहोरा ला ये-जा करण्याकरिता रेल्वे व्दारे कन्हान सत्रापुर नवनिर्मित आरयुबी रेल्वे अंडरपास सुरू करून बीकेसीपी शाळेपासुन रेल्वे फाटक रस्ता बंद करण्यात आला होता. 

         परंतु पहिल्याच दिवशी कन्हानला आलेल्या पावसाच्या पाण्यामुळे नवनिर्मित कन्हान ते सत्रापुर आरयुबी रेल्वे अंडरपास पुला मध्ये पाणी निकासी करिता व्यवस्था नसल्याने २ ते ३ फुट तुळुंब पाणी साचुन सत्रापुर सिहोरा ला पायदळ व वाहनाने जाण्याऱ्या येण्याऱ्या नागरिकांना पाण्यातुन ये-जा करून भयंकर त्रास सहन करावा लागल्याने नागरिकांनी पाणी निकासी व पर्याप्त विद्युत व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी केली होती.

         याकडे कन्हान – पिपरी नगर परिषद आणि रेल्वे प्रशासना ने दुर्लक्ष केल्याने कन्हान शहरात शनिवार (दि.१६) मार्च ला सायंकाळी विजेच्या कडकडाट , हवेच्या वादळी वाऱ्या सह झालेल्या जोरदार पावसामुळे पुन्हा एकदा पावसाचे पाणी साचल्याने पायदळ व वाहनाने जाण्याऱ्या येण्याऱ्या नागरिकांना पाण्यातुन ये-जा करून भयंकर त्रास सहन करावा लागल्याने सामाजिक कार्यकर्ता अर्जुन पात्रे यांनी नगर परिषद आणि रेल्वे प्रशासना ला पाणी निकासी व पर्याप्त विद्युत व्यवस्था तात्काळ करण्याची मागणी केली आहे.