राजेंद्र रामटेके
विशेष प्रतिनिधी
अहेरी तालुका अंतर्गत येत असलेल्या मौजा – मरपल्ली येथे नव्याने स्थापन करण्यात आलेल्या भव्य क्रिकेट क्लबचे उद्घाटन युवा नेते हर्षवर्धन बाबा आत्राम यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात पार पडले. गावातील युवकांना क्रीडा क्षेत्रात प्रोत्साहन देण्यासाठी व त्यांच्या अंगी असलेली प्रतिभा विकसित व्हावी या उद्देशाने क्रिकेट क्लबची स्थापना करण्यात आली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अरुणभाऊ मुक्कावार होते. यावेळी रतन दुर्गे सर, अरुण वेलादी (सरपंच, मरपल्ली), श्रीनिवास गावडे, बानय्या कुमरे, व्येंकटी कोंडागुर्ले, चंदू दुर्गे, आसुमती कोंडागुर्ले, ललिता पेटगू, बापू मेटकी तसेच आकाश शिंदे (पोलीस केंद्र, मरपल्ली) आदी मान्यवरांची उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रावण कोंडागुर्ले यांनी केले.
अध्यक्ष प्रसंगी अरुणभाऊ मुक्कावार यांनी युवकांनी खेळाला प्राधान्य देत शिस्त, संघभावना आणि मेहनतीच्या जोरावर यश संपादन करावे, असे मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गावकऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.


