Home Social जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगांव येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात...

जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगांव येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न…

शुभम गजभिये 

 विशेष प्रतिनिधी

 पळसगांव :- चिमूर तालुका अंतर्गत मौजा विहीरगांव येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा विहीरगांव येथे बाल आनंद मेळावा मोठ्या उत्साहात संपन्न झालाय.

           बाल आनंद मेळाव्यात मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांच्या कल्पकतेचे कौतुक केले.शालेय जीवनात अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो आणि त्यांना व्यावहारिक ज्ञान मिळतो असे मत शिक्षिका यामिना नारनवरे यांनी व्यक्त केले.

           बाल आनंद मेळाव्यात विद्यार्थ्यांनी शाळेच्या आवारात विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून नागरिकांचे लक्ष वेधले.

            बाल आनंद मेळाव्या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा वर्षा नैताम,उपाध्यक्षा अल्का जीवतोडे,विहीरगांवच्या सरपंच शितल मुंडरे,मनिषा राणे,दौलत मोहिनकर,यशवंत गेडाम,परमेश्वर रामटेके,ग्रामपंचायत सदस्य विकास बारेकर,पोलीस पाटील दुर्गेश्वर चन्ने,शिक्षक कोटेवार गणविर यांच्यासह आशा वर्कर अंगणवाडी सेविका ग्रामस्थाचे मालाचे सहकार्य लाभले.