Home Maharashtra महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल,देशांतर्गत महाराष्ट्र राज्यात पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू…

महिलांच्या आरोग्यासाठी ऐतिहासिक पाऊल,देशांतर्गत महाराष्ट्र राज्यात पहिले ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू…

ऋषी सहारे 

  संपादक

गडचिरोली, : महिलांच्या आरोग्याला केंद्रस्थानी ठेवत,राज्यातील सर्व शासकीय रुग्णालये तसेच शहरी भागांमध्ये राज्यमंत्री ना.मेघना बोर्डीकर यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहे.

       मकरसंक्रांती निमित्त महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला मोठा प्रतिसाद मिळत असून,खऱ्या अर्थान महिलांच्या आरोग्याची गोड भेट राज्यमंत्री मेघना बोडर्डीकर यांनी सर्व महिलांना दिली आहे.

        या उपक्रमाबद्दल संवेदनशील महिला व आरोग्यदृष्टी असलेले नेतृत्व यासाठी महिलांनी राज्यमंत्री मेघना बोडर्डीकर यांचे कौतुक केले असून त्यांच्याप्रती आभार देखील व्यक्त केले आहेत.

        मेनोपॉज म्हणजे महिलांच्या आयुष्यातील अत्यंत जिव्हाळ्याचा व संवेदनशील टप्पा. या काळात होणारे शारीरिक बदल,मानसिक ताण,हॉर्मोनल असंतुलन,हाडांचे आजार,झोपेचे विकार व नैराश्य याकडे आजवर दुर्लक्ष होत होते.

        हीच गरज ओळखून राज्यमंत्री मेघना बोर्डीकर यांनी महिलांसाठी विशेष ‘मेनोपॉज क्लिनिक’ सुरू करण्याचा दूरदृष्टीपूर्ण निर्णय घेतला.

            महत्वाची बाब म्हणजे,देशात प्रथमच अशा प्रकारचे मेनोपॉज क्लिनिक सुरू करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य ठरले आहे.

         महिलांच्या आरोग्याबाबत महाराष्ट्राने घेतलेले हे पाऊल इतर राज्यांसाठी मार्गदर्शक ठरणार आहे.

          जिल्हा महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथे रजोनिवृत्ती पश्चात (मेनोपॉज) क्लिनिकचे उद्घाटन नवनिर्वाचित नगरसेविका तथा आरोग्य सभापती श्रीमती वर्षाताई शेडमाके यांच्या हस्ते संपन्न झाले. 

          सदर कार्यक्रम डॉ.वर्षा लहाडे (जिल्हा शल्य चिकित्सक), डॉ.प्रताप शिंदे (जिल्हा आरोग्य अधिकारी) व डॉ. माधुरी किलनाके (वैद्यकीय अधीक्षक) यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. कार्यक्रमास आरोग्य विभागातील विविध अधिकारी व तज्ञ तसेच कर्मचारी उपस्थित होते.

         जिल्हा महिला व बाल रुग्णालय,गडचिरोली येथे रजोनिवृत्ती झालेल्या महिलांसाठी दर बुधवारी बाहारुग्ण विभागात विशेष सेवा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत.

       या क्लिनिकच्या माध्यमातून तज्ज्ञ वैद्यकीय सल्ला,मानसिक आरोग्य समुपदेशन,हाडे,हृदय व हॉर्मोन तपासणी,औषधोपचार व मार्गदर्शन एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येत आहे.

        आरोग्य राज्यमंत्री,श्रीमती ना.मेघना बोडीकर “मेनोपॉज हा आजार नाही,तर महिलांच्या आयुष्यातील एक नैसर्गिक टप्पा आहे. 

       मात्र,या टण्यात महिलांना शारीरिक आणि मानसिक आधाराची अत्यंत गरज असते.

        राज्यातील प्रत्येक महिलेला या काळात योग्य सल्ला,उपचार आणि सन्मान मिळावा,यासाठीच मेनोपॉज क्लिनिक सुरू करण्यात आले आहेत.

          महिलांचे आरोग्य मजबूत झाले,तर कुटुंब,समाज आणि राज्य नक्कीच सक्षम होईल.”

       जिल्हा शल्य चिकित्सक, गडचिरोली,डॉ. वर्षा लहाडे रजोनिवृत्ती हा स्वौच्या आयुष्यातील महत्त्वाचा पण दुर्लक्षित टप्पा आहे.हार्मोनल बदलांमुळे होणारे शारीरिक त्रास,मानसिक अस्वस्थता,हाडांचे आरोग्य,हृदयाचे संरक्षण व एकूण जीवनमान याकडे समग्र दृष्टीने पाहणे आवश्यक असते.

         मेनोपॉझ क्लिनिकमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञांच्या तज्ज्ञ मार्गदर्शनाखाली वैयक्तिक समुपदेशन,योग्य तपासण्या,उपचार व जीवनशैलीविषयक सल्ला देऊन महिलांना या टण्यात निरोगी,आत्मविश्वासपूर्ण व सशक्त जीवन जगण्यासाठी सक्षम केल्या जाईल.