ऋषी सहारे
संपादक
आरमोरी :- तालुक्यातील जोगीसाखरा येथे बाजार चौकात दरवर्षी प्रमाणे या वर्षी सुध्दा संपुर्ण भागवत मंडळाच्या वतीने संगीतमय कृष्णलीला भागवत कथा कथाव्यास श्री साईधाम सेवाश्रम वारी प्रवचनकार हभप बाळकृष्ण सुराशे महाराज शिर्डी प्रवचन दि.२३ जानेवारी ते दि.२९ जानेवारी पर्यंत आयोजित करण्यात आलेला आहे.
जोगीसाखरा येथिल संपूर्ण भागवत मंडळाच्या वतीने श्री.साईधाम सेवाश्रम वारी शिर्डी यांच्या प्रवचन दिनांक २३ जानेवारीला सुरुवात करुण दि.२९ जानेवारी ला समारोपीय कार्यक्रमात गावातुन वाजत गाजत शोभायात्रा काडून गोपाल काला फोडुण समारोप होणार आहे.
यात साप्ताहिक कार्यक्रम रोज सकाळी काकड आरती रामधुन रोज सायंकाळी हरीपाट ,रात्रौ कथा प्रवचन, झाक्या ,दिनांक २९ जानेवारीला गोपाल काला व विवाह सोहळा संपन्न होणार आहे.
या कार्यक्रमाला बहुसंख्येने उपस्थित राहावे असे आवाहन भागवत मंडळाचे अध्यक्ष खुमदेव गरफडे उपाध्यक्ष विजय सहारे सचिव गणेश मानकर, प्रफुल्ल कहालकर ,प्रफुल्ल धोटे, अजय सपाटे ,प्रदिप सडमाके, नरेंद्र फुलबाधे, अबरदास काबळी ,देवराव राऊत ,भास्कर राऊत, अनिल मोहुर्ले, मंगेश ठाकरे ,यशवंत राऊत, मंगेश ढोरे ,संतोष कांबळी, यशवंत कुमरे ,सुरेश मेश्राम ,नरेंद्र वझाडे ,कवडु ठाकरे ,गणेश सयाम ,प्रविण ढोरे, इत्यादी केलेले आहे.



