Home उपक्रम आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रमांची भर…

आळंदी नगरपरिषद शाळांमध्ये नवीन शैक्षणिक वर्षात नाविन्यपूर्ण उपक्रमांची भर…

दिनेश कुऱ्हाडे 

   उपसंपादक 

आळंदी – आळंदी नगरपरिषदच्या वतीने नगरपरिषद सभागृहात आज नवीन शैक्षणिक वर्षाच्या अनुषंगाने सहविचार सभेचे आयोजन करण्यात आले. या बैठकीस नगरपरिषदेचे माननीय मुख्याधिकारी माधव खांडेकर साहेब अध्यक्षस्थानी उपस्थित होते. यावेळी शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी व्ही. एस. सोनकुसळे, शिक्षण प्रमुख अर्चना भिसे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षकवृंद व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

       या सहविचार सभेत मुख्याधिकारी खांडेकर यांनी नववर्षात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी आणि शाळांमध्ये गुणवत्ता वृद्धीसाठी विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवण्याचे निर्देश दिले. तसेच पदोन्नती मिळालेल्या शिक्षक, नवनियुक्त शिक्षक व पदवीधर शिक्षकांचा वृक्षारोपण करून सन्मान करण्यात आला.

राबवण्यात येणारे प्रमुख उपक्रम पुढीलप्रमाणे आहेत…

१)शालेय आवारात वृक्षारोपण करून वर्गनिहाय जबाबदारी वाटप.

२)थोर पुरुषांच्या जयंती-पुण्यतिथी, बालसभा, वकृत्व स्पर्धांचे आयोजन.

३)गणेश जयंतीसारख्या कार्यक्रमांचे नेतृत्व विद्यार्थ्यांकडून प्रश्नमंजुषा, सामान्यज्ञान, इंग्रजी शब्दसंग्रह यांसाठी PPT तयार करून पुराव्यांची नोंद व प्रसिद्धी‘कल्चर डे’ साजरा करणे.

४)स्पर्धा परीक्षा, मंथन शिष्यवृत्ती, आदर्श शिक्षक पुरस्कार उपक्रम.

५)क्षेत्रभेट, परिसरभेट, वनभोजन यांचे आयोजन.

६)पुस्तक महोत्सवास भेट,शालेय क्रीडा महोत्सवाचे आयोजन.

शिक्षकांसाठी दिलेल्या सूचना…

१)शंभर टक्के उपस्थिती व बायोमेट्रिक हजेरी अनिवार्य.

२)वर्गात मोबाईल वापरण्यावर बंदी.

३)शालेय आवारात व्यसन निषिद्ध.

४)कोडिंग व रोबोटिक शिक्षणावर भर.

वाचन संस्कृती जोपासण्यासाठी 100 पुस्तके शाळांना उपलब्ध करून ग्रंथालयाची स्थापना..

१)”स्टुडन्ट ऑफ द मंथ” ची निवड.

२)विद्यार्थ्यांमध्ये लेखन, नेतृत्व व व्यक्तिमत्व विकासावर भर.

     शिवकालीन लाठी-काठी, दांडपट्टा प्रशिक्षण वर्गांची सुरूवात मुलींच्या संरक्षणासाठी या सर्व उपक्रमांच्या अंमलबजावणीबाबत मुख्याधिकारी माधव खांडेकर यांनी सर्व शिक्षक व मुख्याध्यापकांना स्पष्ट सूचना दिल्या असून, त्यांच्या काटेकोर पालनावर भर देण्यात आला आहे. सभेच्या शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानत सहविचार सभेची सांगता करण्यात आली.