संत ज्ञानेश्वर माऊलींच्या मंदिरातील ज्ञानज्योत स्तंभाचे नुतनीकरण.

दिनेश कुऱ्हाडे

  प्रतिनिधी

आळंदी : येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी मंदिरात संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधीला १९९५ ते १९९६ यावर्षी सातशे वर्षे पूर्ण झाल्याबद्दल अजानबाग, विठ्ठल रुक्मिणी मंडपात ज्ञानज्योत स्तंभ उभारण्यात आला होता परंतु या स्तंभाच्या भिंतीला कालांतराने तडे जाऊ लागले.

          पुण्यातील हरिनाथ कुटी भक्त मंडळ यांच्या माध्यमातून ज्ञानज्योत स्तंभाचे नुतनीकरण करण्यात यावे अशी मागणी आळंदी संस्थान कडे करण्यात आली. 

              संत ज्ञानेश्वर महाराज संस्थान कमिटीचे प्रमुख विश्वस्त योगेश देसाई आणि विश्वस्त विकास ढगे पाटील यांनी ज्ञानज्योत स्तंभाचे नुतनीकरण करण्यासाठी परवानगी दिली आणि अवघ्या काही दिवसांत योगी ज्ञानज्ञाथजी यांच्या आशीर्वादाने हरिनाथ कुटी भक्त मंडळ यांच्या माध्यमातून ज्ञानज्योत स्तंभाचे नुतनीकरण करण्यात आले. सदर स्तंभाला पुर्ण संगमरवरी फरशी बसविण्यात आली. ज्ञानज्योत स्तंभाचे उद्घाटन त्र्यंबकेश्वर येथील गणेशनाथजी बाबा यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी व्यवस्थापक ज्ञानेश्वर वीर, भगवतीनाथ बाबा, हरिनाथ कुटी भक्त मंडळाचे सुधीर रानडे, नानासाहेब शेळके, माजी नगरसेवक सुरेश कदम, माजी जिल्हा परिषद सदस्य अनिल राक्षे, गौरव रानडे, प्रकाश कदम तसेच हरिनाथ कुटी भक्त मंडळाचे साधक वर्ग बहुसंख्येने उपस्थित होते. याप्रसंगी कात्रज पुणे येथील शिवगोरक्ष भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला.