एकोडी येथे शासन आपल्या दारी उपक्रम…

 नागपूर विभागीय प्रतिनिधी-ऋग्वेद येवले

      साकोली -एकोडी येथील जिल्हा परिषद हायस्कुल येथे तहसील कार्यालय साकोली व ग्रामपंचायत एकोडी यांच्या वतीने शासन आपल्या दारी शिबिर आयोजित करण्यात आले .

 त्या प्रसंगी उदघाटक सभापती गणेश आदे अध्यक्ष जिल्हा परिषद सदस्या माहेश्वरी नेवारे, प्रमुख उपस्थिती नायब तहसीलदार एस .सी.शेंडे, खंडविकास अधिकारी टेंम्बरे साहेब, तालुका कृषी अधिकारी एस.ए. ढवळे, एकोडी येथील सरपंच संजय खोब्रागडे, उपसरपंच रिगण राऊत, बोरगाव सरपंच उषाताई डोंगरवार, घानोड सरपंच लाडे ताई, एकोडी ग्रामपंचायत सदस्य भावेश कोटांगले, वैभव खोब्रागडे, सुकराम बन्सोड, कुंदा जांभुळकर, रहिला कोचे, विभा तरोने,आशा बडवाईक , ग्रामसेवक खंडाळे,तलाठी जी .डी .शिवणकर, पिंडकेपार तलाठी मनीषा उईके, तलाठी सूर्यवंशी मॅडम, मुख्याध्यापक विलास लांजेवार, आरोग्य सहाय्यक अहिर , डॉ . बघेले मॅडम,गट प्रवर्तक यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. 

  शासन आपल्या दारी उपक्रमात निवडणूक विभागा मार्फत फार्म नंबर 6 चे 18 फार्म वाटप नमुना 7 चे 6 फार्म वाटप ,नमुना 8 चे 4 फार्म वाटप करण्यात आले. तलाठी कार्यालया मार्फत 65 सात बारा देण्यात आले, उत्पनाचे दाखले 22, नमुना 8 अ 40, पी एम किसान योजनेचे दोन फार्म वाटप केले. बांधकाम विभाग पंचायत समितीच्या वतीने घरकुल आवास योजनांची माहिती प्रसिद्ध करण्यात आली, प्राथमिक आरोग्य केंद्रा अंतर्गत वैद्यकीय प्रमाणपत्र व आरोग्य विषयक माहिती देण्यात आली, पुरवठा विभागाचे वतीने राशन कार्ड मधून चार राशन कार्डातून कमी करून प्रमाणपत्र देण्यात आले, एक राशन कार्ड मध्ये एक नाव समाविष्ट करण्यात आले. तहसील कार्यालया मार्फत भूमिहीन प्रमाणपत्र दहा, जातप्रमाण पत्र चार , अधिवास प्रमाणपत्र तीन, उत्पनाचे प्रमाणपत्र चार जेष्ठ नागरिक दोन ,श्रावण बाळ योजना एक , एकात्मिक बाल विकास प्रकल्प योजने अंतर्गत माझी कन्या भागेश्री योजना, बेबी केयर किट, गरोदर ,स्तनदा सहा महिने ते तीन वर्षे बालक यांना टी एच आर बाबत माहिती दिली , कृषी विभाग मार्फत महा डी बी टी अंतर्गत ऑनलाईन प्रणालीवर अर्ज करणे, पी एफ एम ई योजना , फळबाग लागवड ,प्रमाणित बियाणे, सुक्ष सिंचन योजना, कृषी विभागाच्या विविध योजनांची माहिती दिली.

     तहसील कार्यालया मार्फत शेंडे साहेब यांनी संजय गांधी निराधार योजने अंतर्गत विविध योजनांची माहिती दिली

     शासन आपल्या दारी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी , तहसील कार्यायलातील कर्मचारी, तलाठी तथा ग्रामपंचायत कर्मचारी ,जिल्हा परिषद हायस्कुल येथील कर्मचारी, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर, आरोग्य विभाग कर्मचारी, कृषिविभाग कर्मचारी यांनी सहकार्य केले. 

 कार्यक्रमाचे संचालन रिगण राऊत तर आभार भावेश कोटांगले यांनी केले.