चामोर्शी तालुक्यात स्त्रीशक्ती शिबिराचे आयोजन….

डॉ.जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली,(जिमाका)दि.17: समस्याग्रस्त व पिडीत महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे तसेच त्यांच्या हक्काचे संरक्षण होवून न्याय मिळावा यादृष्टीने महिलांच्या तक्रारी /समस्या यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवून करण्यासाठी व समाजातील पिडीत महिलांना सुलभ मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर” आयोजित करायचे आहे. तसेच विविध विभागांतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजनांचे स्टॉल लावुन प्रचार करण्यात येणार असून समस्याग्रस्त महिलांच्या तक्रारीचे निवारण देखील करण्यात येणार आहे. 

 दिनांक 24 मे 2023 रोजी सकाळी 9.00 वा. नगरपंचायत सभागृह, चामोर्शी येथे “पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्त्रीशक्ती समाधान शिबिर” आयोजित केलेले आहे. तरी समस्याग्रस्त महिलांनी लेखी तक्रारीसह उपस्थित रहावे, असे आवाहन तहसिलदार , चामोर्शी यांनी केलेले आहे.