ज्योती मेश्राम यांना जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्काराचे वितरण.  

सतिश कडार्ला

  प्रतिनिधी

गडचिरोली,(जिमाका)दि.17: महिला आणि बाल कल्याण क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या महिलांना जिल्हास्तरावर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार देण्यात येतात. सन 2013 – 14 या कालावधीतील पुरस्काराचे वितरण दिनांक 11 एप्रिल रोजी करण्यात आलं. कौटूंबिक हिंसाचारापासून महिलांचे संरक्षण अधिनियम 2005 कायद्याची अंमलबजावणी करीता एक दिवसीय आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेत जिल्हाधिकारी संजय मीणा यांच्या हस्ते ज्योती जयराम मेश्राम यांना प्रदान करण्यात आले. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरण गडचिरोलीचे सदस्य सचिव आर. आर. पाटील, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी प्रकाश भांदककर, बाल कल्याण समितीचे अध्यक्ष वर्षा मनवर, सामाजिक कार्यकर्ते सविता सादमवार उपस्थीत होते. सन 2013 -14 चा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर पुरस्कार ज्योती जयराम मेश्राम यांना प्रमाणपत्र, सन्मानचिन्ह, शाल, श्रीफळ व 10,000 रुपयांचा धनादेश, पुष्पगुच्छ देऊन सन्मानीत केले. यावेळी जिल्हा परिविक्षा अधिकारी विनोद पाटील, संरक्षण अधिकारी रुपाली काळे, विधी सल्लागार सारिका वंजारी, परिविक्षा अधिकारी विलास ढोरे, जिल्हा संरक्षण अधिकारी अविनाश गुरणुले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय मधील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.