गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन एक दिवसीय कार्यशाळेचे आयोजन….

डॉ. जगदीश वेन्नम

  संपादक

गडचिरोली :गडचिरोली पोलीस दलाच्या पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन  पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा. यांच्या मार्गदर्शनाखाली दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत काम करणाऱ्या युवक-युवती तसेच पोलीस अंमलदारांसाठी ‘VLE.’ (Village Level Entrepreneur) ची एक दिवसीय कार्यशाळा दि. १७/०४/२०२३ रोजी पार पाडण्यात आली.

        सदर कार्यशाळेकरीता प्रशिक्षणासाठी १२० प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. या कार्यशाळेत त्यांना C.S.C. कडुन राबविल्या जाणाऱ्या विविध शासकिय योजनांची माहिती देण्यात आली. या प्रशिक्षणामुळे दुर्गम-अतिदुर्गम भागातील नागरिकांना पोलीस दादालोरा खिडकी अंतर्गत बँक सेवा, आयुष्यमान भारत कार्ड, आभा कार्ड, सेव्हींग अकाऊंट, डीजीपे, ई- श्रम कार्ड, पेंशन सर्विस इन्शुरंस या सारख्या सुविधा त्यांच्या दारातच उपलब्ध करून देण्यासाठी सोईचे होणार आहे. यावेळी माहे ऑक्टोबर २०२२ ते फेब्रुवारी २०२३ मधील V.LE. चे उत्कृष्ट काम करणाऱ्या युवक- युवतींचा प्रमाणपत्र व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमात उपस्थित मा. अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता यांनी V.LE. ना मार्गदर्शन केले की, त्यांनी आपल्या हद्दीतील नागरीकांना विविध शासकिय योजनांची माहीती देऊन जास्तीत जास्त नागरीकांना त्याचा लाभ मिळवून द्यावा व ही एक चांगली संधी असुन त्याचा पुरेपुर उपयोग करुन आपले भविष्य उज्वल करावे असे सांगीतले. त्यानंतर कार्यक्रमास उपस्थित असलेले स्टेट हेड (C.S.C.) श्री. वैभव देशपांडे यांनी आपल्या मार्गदर्शनपर भाषणात सांगीतले की, सर्व VLE यांनी पोलीस विभागाने दिलेल्या संधीच सोन करुन दुर्गम अतीदुर्गम भागातील ९० टक्के नागरीकांचे लाईफ इन्शुरंन्स, ई श्रम कार्ड काढून द्यावे व टेली मेडीसीन व टेली लिगलचे वापर करावा या बाबत मार्गदर्शन केले.

      आतापर्यंत गडचिरोली पोलीस प्रशासनाकडुन रोजगार व स्वयंरोजगार मेळाव्याद्वारे पोलीस दादालोरा खिडकीच्या माध्यमातुन सुरक्षा रक्षक ५१२, नर्सिंग असिस्टंट ११४३, हॉस्पीटॅलीटी ३१४, ऑटोमोबाईल २७६, इलेक्ट्रीशिअन १६७, प्लंबींग ३५, वेल्डींग ३८, जनरल ड्यूटी असिस्टंट ३१४, फील्ड ऑफीसर ११ व व्हीएलई ५२, सेल्समैन ४ असे एकुण २८६६ युवक/युवतींना रोजगार उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच कृषी तंत्रज्ञान व व्यवस्थापन (आत्मा) सोनापुर, गडचिरोली व बीओआय आरसेटी गडचिरोली यांचे मार्फत ब्युटीपार्लर १७४ मत्स्यपालन ८७, कुक्कुटपालन ५६६, बदक पालन १०० वराहपालन १०, शेळीपालन १४९ शिवणकला २४१, मधुमक्षिका पालन ५३, फोटोग्राफी ६५, भाजीपाला लागवड १३९५, पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण १०६२, टू व्हिलर दुरुस्ती ९९, फास्ट फुड ९६, पापड लोणचे ५९, दु/ फोर व्हिलर प्रशिक्षण ५०२, एमएससीआयटी २००, कराटे प्रशिक्षण ४८ व सॉफ्ट टॉईज प्रशिक्षण २७ असे एकुण ४९२३ युवक-युवतींना स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्यात आले आहे.

सदर कार्यशाळेच्या कार्यक्रम प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणुन  पोलीस अधीक्षक श्री. नीलोत्पल सा., अपर पोलीस अधीक्षक (प्रशासन) श्री. कुमार चिंता सा., अपर पोलीस अधीक्षक (अभियान) श्री. अनुज तारे सा., अपर पोलीस अधीक्षक अहेरी श्री. यतिश देशमुख सा. तसेच कार्यक्रमास स्टेट हेड (C.S.C.) श्री. वैभव देशपांडे, डिव्हिजन मैनेजर (C.S.C.) गडचिरोली श्री. निलेश कुंभारे, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (C.S.C.) गडचिरोली श्री. शाहिद शेख, डिस्ट्रिक्ट मॅनेजर (C.S.C.) गडचिरोली श्री. विशाल कुंभाळकर, अॅक्सीस बैंक मैनेजर नागपूर सर्कल श्री. अभिजीत डबीर, अॅक्सीस बँक मॅनेजर श्री. भुषण मालवी, अॅक्सीस बँक मॅनेजर श्री. प्रशांत झाडे व आभा कार्ड / आयुष्यमान कार्ड मॅनेजर प्रिती गोलदार मॅडम हे उपस्थित होते.

या कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी तसेच नागरी कृती शाखेचे प्रभारी अधिकारी पोउपनि धनंजय पाटील, व सर्व पोलीस अंमलदार यांनी विशेष परीश्रम घेतले.