गडचिरोली जिल्हा काँग्रेस च्या वतीने “नरेंद्र मोदी जवाब दो” आंदोलन.

 

दखल न्यूज भारत

विजय शेडमाके

  प्रतिनिधी

गडचिरोली : भाजपचे वरिष्ठ नेते, जम्मू काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी पुलवामा घटना व ३०० कोटीच्या ऑफरचा केलेला आरोप अत्यंत गंभीर आहे. सत्यपाल मलिक यांनी केलेले आरोप, भ्रष्टाचार व देशाच्या सुरक्षेच्यादृष्टीने अत्यंत चिंताजनक आहे. पुलवामा घटनेमध्ये ४० जवानांचे बळी गेले आणि त्यात सरकारची चुक असणे हे निदर्शनास आणून दिले असता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्यांना गप्प राहण्यास सांगीतले, असाही थेट आरोप मलिक यांनी केला असून त्यांच्या आरोपांचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी अद्यापही उत्तर दिलेले नाही. नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारच्या हुकूमशाही विरोधात गडचिरोली जिल्हा काँग्रेसच्या वतीने जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे यांच्या नेतृत्वात गडचिरोलीत “जवाब दो मोदी जवाब दो” आंदोलन करण्यात आले.

आंदोलनादरम्यान पुलवामा घटनेत केंद्र सरकारची अक्षम्य चूक झाली आहे, या वक्तव्यावर मलिक यांना गप्प राहण्यास का सांगीतले गेले ? भारतीय जवानाना दुसरीकडे पाठविण्यासाठी विमानाची मागणी केली असता, ती का नाकारण्यात आली ? पुलवामा घटनेत वापरले गेलेले ३०० किलो आर. डी. एक्स. कुठून आले ? पुलवामा घटना व ४० जवानांचे बलिदान हे भाजपा व नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणूक जिंकण्यसाठी केले होते का ? श्री. मलिक यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघटन महासचिव राम माधव यांनी ३०० कोटी रुपयांची ऑफर का दिली ?

अदानी समूहाच्या घोटाळ्याबद्दल मा. राहुलजी गांधी यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांचे मोदींनी उत्तर द्यावे.? शेतकऱ्यांचे आयुष्य बर्बाद करणाऱ्या तीन काळ्या कायद्यांबद्दल आणि हे काळे कायदे वापस घेण्यासाठी आंदोलन करतांना शहीद झालेल्या ७५० पेक्षा जास्त शेतकऱ्यांच्या मृत्युला जबाबदार कोण? याचे उत्तर मोदींनी द्यावे. पीक विम्याच्या नावाखाली अदानी-अंबानी साठी अन्नदात्याचा बळी घेणारे व जनतेची तिजोरी लुटून देणारे कोण ? याचे उत्तर मोदींनी द्यावे. असे अनेक प्रश्न विचारण्यात आले.

यावेळी जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे, माजी आम. डॉ. नामदेव उसेंडी, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस महासचिव तथा जिह्वा प्रभारी डॉ. नामदेव किरसाण, प्रदेश सचिव डॉ. नितीन कोडवते, शहर अध्यक्ष सतीश विधाते, महिला प्रदेश सचिव भावना वानखेडे, महिला अध्यक्ष ऍड. कविता मोहरकर, तालुकाध्यक्ष वसंत राऊत, वडसा तालुकाध्यक्ष राजेंद्र बुल्ले, माजी नगरसेवक रमेश चौधरी, ओबीसी सेल कार्याध्यक्ष दिवाकर निसार, अनुसूचित जाती सेल अध्यक्ष रजनीकांत मोटघरे, सहकार सेल उपाध्यक्ष अब्दुल पंजवाणी, शंकरराव सालोटकर, नेताजी गावतुरे, पांडुरंग घोटेकर, समय्या पशुला, सुनील चडगुलवार, सुरेश भांडेकर, अनिल कोठारे, दत्तात्रय खरवडे, घनश्याम मुरवतकर, सुधाकर मेश्राम, ढिवरू मेश्राम, निकेश कामीडवार, बाळुजी किणेकर, हरबाजी मोरे, महादेव हिचामी, नीलकंठ पेंदाम, ज्ञानेश्वर पोरटे, आशिष नैताम, प्रफुल आंबोरकर, गणेश कोवे, जावेद खान, भीमराव शेंडे, रमेश धकाते, नृपेश नांदनकर, कल्पना नंदेशवर, आशा मेश्राम, अपर्णा खेवले, विद्या कांबळे, वर्षा गुलदेवकर, भैयाजी मुद्दमवार, सुदर्शन उंदीरवाडे, मधुकर नैताम, राजेंद्र कुकडकर, प्रभाकर कुबडे, संजय करानकर, टिकारामजी सहारे, पुष्पाताई कोहपरे, पदमा कोडापे, सदाशिव कोडापे, शुभम किरमे सह मोठ्या संख्येने काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.