शुभम गजभिये
विशेष प्रतिनिधी..
सातारा (ता.चिमूर) – येथील श्री.गुरुदेव सेवा मंडळांने छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्ताने जाहीर शिवकीर्तन तथा सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजित केले आहे.
दिनांक 18 ते 19 फेब्रुवारी 2026 असा दोन दिवसाची कार्यक्रमावली निश्चित केलेली आहे.या कार्यक्रमाला चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार श्री.बंटीभाऊ भांगडिया यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
तसेच राष्ट्रीय युवा कीर्तनकार ह.भ.प श्री.राज महाराज घुमनर यांच्या मार्गदर्शनात जाहीर शिवकीर्तन संपन्न होणार आहे.
आधुनिक व तंत्रज्ञानाच्या युगात छत्रपती श्री. शिवरायांचा शिवगौरव इतिहास हा समाजातीत प्रत्येक घटकांना माहिती व्हावा व या माध्यमातून बाल,युवा – तरुण यांनी त्यांचा आदर्श व प्रेरणा घेऊन समाजात कार्य करता यावे या संकल्पनेतून आदर्श गाव सातारा चे माजी सरपंच श्री.गजाननजी गुळधे यांनी या करिता पुढाकार घेतला व शिवजयंती निमित्य विविध कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या जाहीर शिवकीर्तन कार्यक्रमाला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आव्हान श्री.गजाननजी गुळधे यांच्या वतीने करण्यात आले आहे.



