भाविकदास करमनकर
धानोरा तालुका प्रतिनिधी
आज दिनांक १७ फेब्रुवारी २०२६ ला धानोरा तालुक्यातील निमगाव येथिल गणेश अलंकार विद्यालयाला मा.शिक्षक आमदार सुधाकर अडबले विधान परिषद सदस्य मुंबई यांनी भेट दिली.
वर्ग 10 वि ची परिक्षा देणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांनी परिश्रम करून चांगल्या पद्धतीने पेपर सोडवून घवघवीत यश संपादन करावे.आणि शाळेचे नाव उज्वल करावे.असे मार्गदर्शन केले. शाळेतील सर्व कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देऊन आमदार अडबले यांचे स्वागत केले.
यावेळी गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली चे सिनेटर सदस्य अजय लोंढे, नरेंद्र भोयर शिक्षक, बापू मुन्घाटे शिक्षक,मशाखेत्री शिक्षक,बी.डब्ल्यू.सावसाकडे मुख्याध्यापक गणेश अलंकार विद्यालय निमगाव दिवाकर भोयर शिक्षक,एस.व्हि.नागदेवते,कु.बि.व्हि.श्रीरामे मॅडम आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि शाळेतील विद्यार्थि उपस्थित होते.



